डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीमुळे देशात बौद्धांची संख्या वाढत आहे. डॉ. भीमराव आंबेडकर*

 *डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीमुळे देशात बौद्धांची संख्या वाढत आहे.   डॉ. भीमराव आंबेडकर*



---------------------------------

आष्टी/प्रतिनिधी

बौद्ध धम्म मानव जातीच्या आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी उपयुक्त असून जगाला युद्धापेक्षा बुद्धाच्या विचाराची अत्यंत आवश्यकता आहे म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतर देशभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम , मेळावे ,बौद्ध साहित्य संमेलन्ने ,धम्म परिषदा होत आहेत. त्या अनुषंगाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्धमय भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि धम्म चळवळ गतिमान होण्यासाठी डोईठाण येथे दिनांक १३ जानेवारी रोजी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही धम्मपरिषद आयोजन करण्यात आली होती. 

पुढे बोलताना भीमरावजी आंबेडकर म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म क्रांती केल्यानंतर देशात बोद्धांची संख्या वाढत आहे.महाराष्ट्रात इतर धर्मांचे लोक जसे धर्म स्विकारत आहेत तसेच इतर राज्यांतही हजारो लोक बोद्ध धम्म स्विकारत आहेत.

बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते मी संपुर्ण भारत देश बौद्धमय करील आणि आज ते वास्तवात उतरले आहे.म्हणजेच ते खरे ठरले आहे.

बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना लिहीत असताना आपल्या भारत देशाच्या तिरंग्या झेंड्यावर सम्राट अशोकाचे अशोक चक्र आहे.आपल्या देशाची राजमुद्रा देखील सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील विजयस्तंभावरुन घेतली आहे.त्याचबरोबर देशाचा राष्ट्रीय वृक्ष बोधीवृक्षच आहे. अशा प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपला देश बौद्धमय केला आहे.

त्याचप्रमाणे आता आपल्या धम्माचे आचरण करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.ती आपण योग्य रीतीने पार पडली पाहीजे.असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ भीमरावजी आंबेडकर साहेबांनी केले आहे.

या धम्मपरिषधेला आष्टी तालुक्यातील धम्म बांधव व महीलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे बीड जिल्हा व आष्टी तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वीतेने पार पाडण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या आष्टी तालुका व डोईठाण शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.