*आप तर्फे महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांना निवेदन*
अमरावती : प्रतिनिधी
आम आदमी पार्टी अमरावती महानगरच्या युवा आघाडीचे अध्यक्ष नागेश लोणारे यांच्या नेतृत्वात राजापेठ महावितरण क्र 2 केंद्राचे सहाय्यक अभियंता अमोल गेडाम यांना निवेदन देण्यात आले.
स्थानिक प्रभाग क्र ९ मधील शितला विहार व खंडेलवाल लेआऊट महादेवखोरी परीसर या भागात विद्युत खांब नसल्याने रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधार राहतो आजूबाजूला महादेवखोरी परिसर हा अर्धा जंगलचा भाग असून रात्रीच्या वेळी नागरिकांना रस्त्यावर अंधार राहत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.तसेच रस्तयावर रात्रीच्या वेळी साप रस्त्यावरून जातांना तेथील स्थानिक रहिवाश्यांना दिसतात पण तेथे अंधार असल्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता महावितरण सहाय्यक अभियंता यानी गांभीर्याने लक्ष देवून या दोन्ही ठिकाणची पाहणी करण्यासाठी महावितरणाचे कर्मचारी तात्काळ पाहणी करण्याकरीता पाठविण्यात यावे. तसेच आजूबाजूला नविन बांधकाम होतअसल्यामुळे नागरीकांना तेथील विद्युत खांब नसल्याने नविन कनेक्शन घेण्याकरीता अडचण निर्माण होत आहे. या निवेदनात मार्फत समस्या सांगण्यात आल्या. यावेळी शोभाताई डोंगरे, बेबीताई विघ्ने, पद्मा बागडे, लता तायडे, अंजली चवरे आशा राऊत प्रभावती गावंडे, लता मोहोड, विद्या राऊत, भुमिका सहारे, नंदिनी ढोके, अलका इंगळे, रमा पवार, यशोधरा भडके, सुनिता इंगळे, चारूशिला पंडीत लता रामटेके, संगिता कांबळे, ज्योसना गवई, रश्मी सोमकुवर, नंदा राऊत, प्रमिला भगत, वासुदेव डोंगरे, नंदकराव विघ्ने, पवन रामटेके, मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते.



stay connected