२१ व्या शतकातील सर्व सामान्य मराठ्यांचा राजा मनोज जरांगे पाटील
----------------------------------------
मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी सुमारे चार दशकांपूर्वीची आहे. महाराष्ट्राचे राजकारण, अर्थकारण, संस्कृती, शिक्षण वा इतर अनेक क्षेत्रात मराठा समाजाचा प्रभाव आहे तरी या मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ का येते आहे याचा ही कुठे तरी विचार होणं गरजेचे आहे.महाराष्ट्रातील बहुतांश मराठा समाजाचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे देशाच्या स्वातंत्र्य पूर्व काळात लोकसंख्या कमी होती शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्यामुळे एका कुटुंबात शेती जास्त असायची, भौतिक मूलभूत गरजा कमी असल्यामुळे कमी उत्पन्नात भागायचे कालांतराने गरजा वाढल्या त्यात परत कुटुंब विस्तार झाल्यामुळे शेतीची विभागणी झाली व जास्त शेती असणारा मराठा समाज हळूहळू अल्पभूधारक होत गेला.आजची शेती तर पावसाच्या अनियमितपणामुळे कायमच अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या फेऱ्यात अडकलेली असते म्हणूनच दिवसेंदिवस बेभरावश्याची होत जाणारी शेती, पिकलेल्या शेत मालाला कवडीमोल मिळणारा भाव, त्यातच आरोग्याचे, मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न, मुलींच्या लग्नाचे प्रश्न यातच शेतकरी खचून जातो व नैराश्यात अडकतो, काही शेतकरी तर आत्महत्येसारखा मार्ग जवळ करतात. खरं तर शेतीवर आधारीत अर्थव्यवस्था जर बळकट झाली असती तर आज होत असलेली मराठा आरक्षणची मागणी व त्याचा होत असलेला उद्रेक झालाच नसता. कोणत्या जातीला किती आरक्षण सवलती मिळतात त्यापेक्षा मराठा जातीला कुठलीच सवलत मिळत नाही याचे सर्वात मोठे शल्य मराठा तरुण तरुणीमध्ये निर्माण झाले आहे किंबहुना इथल्या अन्यायिक व्यवस्थेने ते निर्माण केले आहे असं म्हणलं तरी ते वावग ठरणार नाही. शिक्षण क्षेत्रात असलेल्या आरक्षण धोरणामुळे मराठा समाजातील हुशार व होतकरू तरुण तरूणीचे मोठे नुकसान होतं आहे त्यांना इतरांसारखी फीस व मार्क यामध्ये कुठलीही सवलत मिळत नाही त्यामुळे मराठा समाजातील गरीब घरातील मुले शिक्षणात, नौकऱ्यात मागे पडत आहेत हेच मराठा समाजाचे भयान वास्तव समाजासमोर येत आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा, विधानसभा, ज़िल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायत या सर्वां मध्ये मराठा समाजाची भूमिका कायम निर्णायक राहीली आहे कायम सत्त्ता कारणात मोठा वाटा ही मराठा समाजाला मिळतो परंतु या मोठ्या संख्येने असलेल्या गरीब मराठ्यांसाठी काही तरी करावे असे कुठल्याच पक्षाच्या राजकीय प्रस्थापीत नेतृत्व करणार्यांना कधी वाटले नाही. मराठा समाजाला आज जर आरक्षण मिळाले तर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक बाबतीत काही तरी फायदा होईल याच एका आशेवर मराठा समाज आपल्यातीलच एक सर्वसामान्य असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात एकवटला आहे . ग्रामीण भागातील खरा गरजवंत मराठा समाज मनोज जरांगे पाटील या सर्वं सामान्य शेतकऱ्याच्या पोराच्या नेतृत्वात आंदोलनात सक्रिय होता याची राज्यात फारशी कुठे चर्चा नव्हती त्यातच अंतरवली सराटी या लहानश्या गावात मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरु केले अनेक गावातील लोकं त्यांच्या बरोबर बसली त्यातच एक सप्टेंबर रोजी या आंदोलन करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला केला आंदोलकाकडून तुफान दगड फेक सुरु झाली व या आंदोलनाला हिंसक वळण लागले. महाराष्ट्रात ही बातमी गेली सामान्य लोकांपासून राजकारणी नेत्यांपर्यंत सर्वांची रीघ अंतरवली सराटी येथे लागली मनोज जरांगे या सर्वसामान्य युवकाचे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाले मराठा आरक्षण संदर्भात ठाम भूमिका मांडणारे मनोज जरांगे मराठा समाजला प्रामाणिक व आपले वाटू लागले. त्यांनी उपोषण सलग सतरा दिवस चालू ठेवले मराठ्यांचे लाखो लोकं त्यांना भेटून पाठिंबा देण्यासाठी येऊ लागले. गोर गरीब मराठा समाजाच्या काळजात दाटलेली खदखद, समाजाची वेदना, आक्रोश मनोज जरांगे यांच्या शब्दातून व्यक्त होऊ लागला. त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अंतरवाली सराटी येथे यावे लागले सर्वं लोकांसमोर तीस दिवसात यावर मार्ग काढू असा शब्द द्यावा लागला. एक तर मुळातच आजचे गलिच्छ राजकारण व त्यातील नेत्यांवर सर्वसामान्य लोकांचा अजिबात विश्वास राहिलेला नाही म्हणूनच मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक धडपड करणाऱ्या एका सामान्य कुटुंबातील मनोज जरांगे या एकट्या तरुणाने या गरजवंत मराठा समाजाच्या काळजाला हात घातला आणि खऱ्या अर्थाने लाख नव्हे तर कोटी च्या संख्येने मराठा समाज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात स्वयंस्फुर्ती व स्वखर्चाने एकवटला आणि या आंदोलनाला चेहरा आणि दिशा मिळाली. केवळ मराठा आरक्षण ही एकच भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली, एक तर माझी स्वतःची अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा आरक्षणाची विजययात्रा निघेल या शब्दामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज भावुक झाला त्यांच्या पाठीमागे सर्वं ताकतीने उभा राहिला. ग्रामीण भागात सुरु झालेल्या या आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत चालली त्याचाच परिणाम म्हणुन जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनाच्या आवहानाला कोटी च्या संख्येने मराठा समाजाने साथ द्यायला सुरुवात केली.अंतरवली सराटी येथे तर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी अशी मराठ्यांची दोन कोटी लोकांची उपस्थिती असलेली सभा पार पडली. सरकारने प्रत्येक वेळी नवनवीन आश्वासन देवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न चालवला आहे. जस्टिस शिंदे यांच्या नेतृत्वात नेमलेल्या कमिटीला ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या त्यातील काही लोकांना तत्काळ जातीचे दाखले दिले परंतु ते तुलनेने खूपच कमी आहेत.चार पिढ्या पूर्वीच मराठे कुणबीत असून नोंदी लपवल्या गेल्या, लोकांना सवलतीपासून वंचित ठेवल गेलं आज जरांगे पाटलामुळे हे समोर आले आहे .आज सर्व सापडलेल्या नोंदी व त्यांच्या वारसांना जरी नियमात जातीचे दाखले दिले तरी दीड कोटी मराठा ओबीसी मध्ये जाणार आहे. हे ही जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मिळालेले यश मराठ्यांच्या दृष्टीने काही कमी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर इतक्या मोठया संख्येने एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीच्या नेतृत्वात मराठा समाज एकवटला आहे ज्याची भविष्यात इतिहासाला कायम नोंदच घ्यावी लागेल.मराठ्यांनी मनोमन आज २१ शतकातील मराठ्यांचा राजा मनोज जरांगे पाटीलच आहेत हे ठरवून टाकले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून संख्येने मोठा असलेला मराठा समाज कायमच अठरा पगड जातींना बरोबर घेऊन चालला आहे म्हणूनच आज मुस्लिम सहीत अठरा पगड जाती जरांगे पाटील यांना खांद्याला खांदा लावून साथ देत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज जसे रयतेच्या कल्याणासाठी मोहिमेवर निघायचे तश्याच मराठ्यांच्या लेकरांच्या कल्याणासाठी २१ शतकातील मराठ्यांचा राजा मनोज जरांगे पाटील कोट्यावधी मराठे घेवून मुंबईच्या मोहिमेवर पायी निघाले आहेत ते पण शांततेच्या मार्गाने , लोकशाही राज्य व्यवस्थेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून आपला हक्काचा असलेला आरक्षण लढा लढण्यासाठी,हा लढा अंतिम टप्यात येणं आता गरजेचे आहे केंद्र व राज्य सरकारने वेळकाढूपणा न करता तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे नाहीतर तेथे जमलेला कोट्यावधी मराठा समाजाचा हा महाप्रलंय कोणती भूमिका घेईल हे आज तरी सांगणं कठीण आहे...!!


stay connected