*मानवी जीवनाच्या उत्क्रंती साठी संशोधनाचा फायदा व्हावा. :- डॉ. आनंद वाघ.*
आष्टी/प्रतिनिधी
संशोधनाचा फायदा मानवी जीवनाच्या उत्क्रांती, मानवी मूल्ये व संवेदना जपण्यासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विस्तार विभागाचे संचालक डॉ. आनंद वाघ यांनी केले.
श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा या शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित हवामानातील बदल आणि आत्मनिर्भर भारता पुढील आव्हाने या विषयांवरील २ दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्थेचे कार्याध्यक्ष कांतीलालजी चानोदिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास संस्थेचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष गोकुळदासजी मेहेर, प्रधानमंत्री हेमंतकुमार पोखरणा, बाबुलालजी भंडारी, कोषाध्यक्ष डॉ. उमेश गांधी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या उपविभागाचे संचालक डॉ. राजेश शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ धाराशिव उपविभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव, डॉ. नितीन पाटील, प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, प्राचार्य सोपानराव निंभोरे, आधिसभा सदस्य डॉ. राजेश करपे, डॉ. मुंजा धोंडगे, डॉ. नितीन पाटील, प्राचार्य श्रीरंग खिलारे, प्राचार्य डॉ. नंदकुमार राठी, उप प्राचार्य डॉ. जवाहर भंडारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. आनंद वाघ पुढे म्हणाले की, संशोधनामुळे निसर्गाला व समाजाला कुठलेही हानी पोहचता काम नये हा विचार या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेतून पुढे आला. त्यामुळे ही परिषद ज्ञानाची प्रकिया गतिमान करणारी ठरली. त्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी व संयोजक अभिनंदनास पात्र आहेत. कुठलेही संशोधन हे समाजाच्या उद्धारासाठी पूरक ठरले पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी डॉ. राजेश शिंदे, डॉ. सुयोग अमृतराव, डॉ.राजेश करपे, प्राचार्य हरिदास विधाते, प्राचार्य सोपानराव निंभोरे, डॉ. हिप्पर, डॉ. उमेश गांधी यांचीही भाषणे झाली.
प्रधानमंत्री हेमंतकुमार पोखरणा म्हणाले की, आपल्या सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीमुळे ही परिषद यशस्वी झाली. आणि आम्हा सर्व विश्वस्त मंडळाला नव्याने चांगले काम करण्याची उभारी मिळाली. संस्थेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. हा आमचा आणि संस्थेचा गौरव आहे. आगामी काळात ही संस्था अनेक समाजोपयोगी कामे हाती घेणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
यावेळी डॉ. काकासाहेब पोकळे, प्रा. डॉ. सत्यप्रेम घुमरे, प्रा. डॉ. आर. जी. विधाते, प्रा..डॉ. अभय शिंदे, प्रा. डॉ. सज्जन गायकवाड प्रा. डॉ. मंडलिक, प्रा.आशिष गट्टानी, प्रा. डॉ. श्याम सांगळे, प्रा. डॉ. प्रशांत साबळे, प्रा. डॉ. राम बोडके, प्रा. डॉ. अंजली खिलारी, प्रा दशमी हमीद, डॉ. रंजना यवागली, डॉ. स्वाती वाघ आदी उपस्थित होते.
प्रा.डाँ.राधाकृष्ण जोशी यानी समाज माध्यम प्रसिध्दीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशासकीय अधिकारी प्रा. नवनाथ पडोळे, प्राचार्य गफ्फार सय्यद, प्राचार्य महेश मस्के, मुख्याध्यापक मथाजी शिकारे, प्रा. धनंजय कोकणे, मोहसीन पठाण, डॉ. मदन मार्कंडेय , डॉ. सुनील पंढरे, डॉ. गोरक्षनाथ शिंदे, सुनीता बोम्बे, डॉ. नवनाथ विधाते, डॉ. जमीर सय्यद, डॉ..चंद्रशेखर तळेकर, डॉ. अशोक कोरडे, डॉ. संजय शिंदे, डॉ. अण्णासाहेब शेळके, डॉ. पांडुरंग अनारसे, प्रा. दत्तात्रय हरकर, डॉ. किशोर कोईनकर, डॉ. किशोर चौधरी, डॉ. श्रीकांत मगर, डॉ. शिवाजी भोसले, डॉ. शिवराज पाताळे, डॉ. मीरा नाथ, डॉ. प्रशांत मेहेर, डॉ. आशिष कुमार कटारिया, विठ्ठल पालवे, बाळासाहेब कदम, रंगा शिंदे, सतीश चोरडिया, अशोक खाडे, मुकुंद बेलेकर, ज्ञानेश्वर खंदारे, नेहरू वाळके, केशव सहस्त्रबुद्धे, ज्ञानेश्वर भोसले, बापू गोंदकर, सतीश पवार, अनिता टकले, संतोष गोडसे, महेंद्र पेठकर आदींनी परिश्रम घेतले. प्राचार्य डॉ. नंदकुमार राठी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अमोल कल्याणकर यांनी सूत्र संचालन केले. डॉ. धनश्री मुनोत यांनी आभार मानले.


stay connected