कडा ग्रामपंचायत समोर सोमवारी गाजर आंदोलन
ग्रामपंचायत कडा /गटविकास अधिकारी /तहसीलदार आष्टी यांच्याकडून याप्रकरणात आतापर्यंत कारवाही शुन्य ?
कडा /प्रतिनिधी...
आष्टी तालुक्यातील कडा येथिल आदित्य मोरे या युवकाने स्वतः च्या राहत्या घरात ये-जा करण्यासाठीच्या एकमेव रस्तावरील होत असलेले व झालेले अतिक्रमण रस्त्याची मोजणी करून काढण्यात यावे म्हणून ग्रामपंचायत कडा कडे लेखी तक्रार ८ सप्टेंबर २०२३ रोजी केली होती .गटविकास अधिकारी,तहसीलदार आष्टी यांच्याकडे हि मागणी केली , आंदोलन केले ,आंदोलनात दिलेले लेखी आश्वासन हि खोटे ठरले . यात चार महिने होत आले तरीही रस्ता काही मोकळा करून दिला नाही. म्हणून पुन्हा आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायत कडा समोर सोमवारी गाजर आंदोलन करणार आहेत .
सविस्तर माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील कडा गावातील आदित्य मोरे हा युवक स्वतः च्या राहत्या घरात ये-जा करण्यासाठीच्या एकमेव रस्तावरील होत असलेले व झालेले असे सर्वच अतिक्रमणे रस्त्याची मोजणी करून काढण्यात यावे , म्हणून चार महिन्यांपासून कडा ते आष्टी चकरा मारल्या आंदोलन केले , तरी अजूनही अतिक्रमण काढले नाही .यासाठी पहिला तक्रार अर्ज ग्रामपंचायत कडाला दि. ८ सप्टेंबर २०२३ रोजी दिला , परंतु यावर महिना होत आला तरी काहिच कारवाही होतांना दिसत नाही , म्हणुन आदित्य मोरे याने पुन्हा दि.५ आँक्टोबर २०२३ रोजी ग्रामपंचायत कडा ला स्मरण पत्र दिले , यावरही दखल घेतली गेली नाही , म्हणून गटविकास अधिकारी / तहसीलदार आष्टी यांच्याकडे दि.७ नोव्हेंबर २०२३ रोजी निवेदन देत कारवाही न झाल्यास ग्रामपंचायत कडा समोर आंदोलन करू असा इशारा ही दिला होता , आणि झाले ही तसेच दोन्हीही अधिकारी यांनी दखल घेतली नसल्याने शेवटी आंदोलन करण्यात आले . हे आंदोलन सुरू असतांना ग्रामपंचायत कडा ने लेखी आश्वासन दिले की, येत्या ३० दिवसात या रस्त्याची मोजणी करून सगळे अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करून देऊ या अटींवर तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले .लेखी आश्वासनाचे ३० दिवस उलटून गेले तरी ही मोजणी नाही , की अतिक्रमणे काढले नाही , आदित्य मोरे ला आपल्याला दिलेले लेखी आश्वासन हे खोटं ठरले ? हे लक्षात आल्यावर पुन्हा गटविकास अधिकारी/ तहसीलदार आष्टी यांच्याकडे दि.२१ डिसेंबर २०२३ रोजी निवेदन देत कारवाही ची विनंती केली असुन यावेळी हि कारवाही केली नाही तर पुन्हा ग्रामपंचायत कडा समोर सोमवार दि.८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता गाजर आंदोलन करण्यात येईल , असा इशाराही देण्यात आला आहे . या निवेदनावर २०पेक्षा जास्त जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत . तसेच पोलिस ठाणे आष्टी , ग्रामपंचायत कार्यालय कडा यांना माहितीस्तव या निवेदनाची प्रत दिली आहे .
stay connected