"महेश्वराची महाश्वेता" या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन
वाफगाव,
शनिवार दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी, वाफगाव किल्ला, राजगुरुनगर,पुणे येथे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित कार्यक्रमात युवराज भूषणसिंहराजे होळकर,युवराज स्वप्नील होळकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले,मा. बाळासाहेब दोडमले सर,मा. सुरेशभाऊ कांबळे सर,मा. घनश्यामबापू हाके सर,अर्जुनदादा सलगर सर,नवनाथ पडळकर सर,सुरेशभाऊ महानवर सर,संतोष बिचुकले सर,उज्ज्वलाताई हाके, वीणाताई सोलणकर,यशोधरा नायकुडे,राहुल शिंदे,व समाजातील प्रतिष्ठित मंडळी यांच्या उपस्थितीत "महेश्वराची महाश्वेता" या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.सदर काव्यसंग्रहाचे संपादन सौ. प्रतिमा अरुण काळे यांनी केले असून या काव्यसंग्रहात राजघराणे, राजव्यवस्था,राज्यातील संकटात न डगमगता पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी केलेले कार्य याबाबत आपल्या भावना कवींनी व्यक्त केलेल्या आहेत.अशा पुस्तकाची आजच्या तरुण पिढीला गरज आहे असे काव्य त्यांच्यापुढे आल्यास चारित्र्यवान व्यक्ती घडतील असे मत भूषणसिंह राजे यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला होळकरांचे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected