-विविध उपक्रम व प्रात्यक्षिक प्रयोगातून आनंददायी शिक्षण -
शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अभ्यासक्रमात विविध उपक्रम, प्रात्यक्षिक, प्रयोग महत्त्वाचे असतात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण करण्यासाठी दैनंदिन अध्यापनामध्ये शाळेत व घरी पालकांच्या व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पालकांच्या सहकार्यातून हार बनवणे, लाकडी वस्तू तसेच मातीच्या चिखलाच्या विविध वस्तू तयार करणे, रंगीबेरंगी कागदाचा वापर करून फुले, विमान, राखी अशा शोभिवंत वस्तू पालकांच्या सहकार्यातून तयार करून मुलांकडून घेतल्या तर मुलांना स्वयंनिर्मितीचा आनंद मिळतो, मुलांचा उत्साह वाढतो. विद्यार्थ्यांचा निरागसपणा आलेला थकवा नष्ट होतो. व विद्यार्थी कृतिशील बनतात. एखादा जर घटक शाळेमध्ये समजला नाही तर प्रत्यक्ष त्या संबंधित घटकाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन उदा. वीट भट्टीला भेट किंवा ऊर्जा निर्मिती प्रकल्पाला, तलावाला भेट देऊन माहिती संकलित केली तर शिक्षणाचे मुख्य उद्दिष्टे साध्य होतात अशी माहिती विविध उपक्रम प्रात्यक्षिक प्रयोगातून आनंददायी शिक्षण हा नवोपक्रम राबवणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कराळेवस्ती ता आष्टी येथील सहशिक्षक श्री बाळासाहेब शेंदुरकर सर यांनी सांगितले
stay connected