डोईठाण येथे भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने दहा दिवशीय बौध्‍दाचार्य श्रामनेर शिबीराचे आयोजन

 डोईठाण येथे भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने दहा दिवशीय बौध्‍दाचार्य श्रामनेर शिबीराचे आयोजन 



-------------------------------------------

आष्टी/प्रतिनिधी

विश्व शांतीदुत सर्वोत्तम भूमिपुत्र भगवान बुद्ध यांच्या धम्माचा प्रचार व प्रसार या भारत भूमीवर प्रत्येक गावात, शहरात व्हावा, बुद्धांचा धम्म सुर्य पुन्हा क्षितिजावर यावा यासाठी स्वतः आपल्या लोखो आनुयायासह महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्‍वतः धम्माची दिक्षा घेऊन लाखो लोकांना धम्म दिक्षा देऊन धम्मचक्र प्रवर्तन केले त्याच धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी स्थापन केलेली सर्व भारतीयांची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा शाखा डोईठाण व आष्टी तालुका कार्यकारणीच्या वतीने मौजे डोईठाण ता. आष्‍टी जि. बीड येथे दिनांक ०४ जानेवारी २०२४ ते दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी दहा दिवशीय बौध्‍दाचार्य श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. शिबीराचे उद्घाटन जिल्हाअध्यक्ष महालिंग निकाळजे यांचे हस्‍ते होणार आहे. या शिबीराचा  सांगता समारोप शनिवार दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी पद्मावती विदयालय डोईठाण, ता. आष्‍टी जि. बीड येथे भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब व राज्य, जिल्हा व तालुका कार्यकारणी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी या धम्म परिषदे निमित्त आयोजित बौध्‍दाचार्य श्रामणेर शिबीराचा लाभ आष्टी तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांनी घ्यावा असे आवाहन तालुका अध्यक्ष सुभाष भादवे, संस्कार उपाध्यक्ष डॉ.प्रा. संभाजी वोव्हाळ अॅड. जितेंद्र खंडागळे, पत्रकार संतोष ससाने, सरचिटणीस तथा पत्रकार आकाश कांबळे दिनकर निकाळजे, सह तालुका कार्यकारणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.