Ahmadnagar Beed Parali Railway 2024 मध्ये धावणार ?

 Ahmadnagar Beed Parali Railway 2024 मध्ये धावणार ?



बीड जिल्ह्या सह मराठवाड्याच्या जिव्हाळ्याच्या अहमदनगर - बीड परळी रेल्वे मार्गाच्या अपडेट बाबत आज आपण जाणून घेणार आहोत . १९९० मध्ये या प्रकल्पाला मान्यता मिळाली मात्र कासव गतीने चाललेल्या या कामाने तब्बल ३४ वर्षानंतर बीडकरांनी रेल्वे पाहण्याचे स्वप्न पुर्णत्वास येत असल्याने समाधान व्यक्त केले आहे . अहमदनगर ते परळी या  रेल्वे मार्गाची एकूण लांबी- 261.25 किमी आहे . पैकी 66 . 18 किलो मिटर आष्टी पर्यंत रेल्वे सुरुही झालेली आहे . उर्वरीत आष्टी ते परळी पर्यंतचे कामही वेगाने पुर्णत्वाकडे जात आहे .



अहमदनगर- बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्गाचे काम अंतीम टप्प्यात पोहचले असून या रेल्वे मार्गासाठी 4805.17 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता . या कामावर आजपर्यंतचा खर्च-  3759.40 कोटी रुपये झालेला असून हा निधी- मध्य रेल्वे आणि राज्य सरकार यांनी  ५० - ५०% दिला आहे . अहमदनगर - बीड - परळी या रेल्वे मार्ग प्रकल्पाची एकूण सद्याची प्रगती- 80% झालेली आहे .

या रेल्वे मार्गाची एकूण लांबी- 261.25 किमी आहे . या प्रकल्पासाठी जमीन संपादन १८२१.६५ हेक्टर म्हणजेच ९९.१५% पूर्ण झाली आहे .

या मार्गावरील अहमदनगर ते न्यू आष्टी हा 66.18 किमी मार्ग पूर्ण झाला असून 23 सप्टेबर 2022 रोजी अहमदनगर - आष्टी डेमू रेल्वे सुरु करण्यात आली आहे . अहमदनगर ते आष्टी रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचे कामही अंतीम टप्प्यात पोहचले असून लवकरच अहमदनगर - ते न्यु आष्टी रेल्वे विजेवर धावताना पहावयास मिळणार आहे .


आष्टी ते एगनवाडी ६७.१२ किमी चा मार्गही पूर्णत्वाच्या जवळ आहे . डिसेंबर 2023 अखेर हे काम पुर्ण होईल अशी अपेक्षा आहे . एकंदरीत २६१ किलो मिटर पैकी १३३ कि मी चे काम पूर्ण झाले आहे . इगनवाडी ते परळी हे १२७ .९५ किमी चे काम प्रगतीपथावर आहे . या रेल्वे प्रकल्पाला १९९० मध्ये मान्यता मिळाली होती प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर हे काम सुरु झाले व आता कुठे हे काम पुर्णत्वास येत असल्याचे चित्र दिसत आहे . आष्टी ते बीड हे ८० की मी अंतर आहे . बीड स्टेशनची कामे ९०% पूर्ण झाली आहेत . अहमदनगर ते परळी रेल्वे मार्गावर एकूण २३ रेल्वे स्थानके प्रस्तावित आहेत . यामध्ये नारायणडोहो - लोणी - सोलापूरवाडी - धानोरा - कडा - आष्टी या रेल्वे स्थानकांचे कामे पूर्ण झालेली आहेत तर यापूढील स्टेशन्स किन्ही - बावी - अंबळनेर - जाटनांदूर - इघनवाडी - रायमोहा - राजूरी - बीड या स्टेशन्स ची कामे प्रगती पथावर आहेत .  मौज- घाटसाळवी - वडवणी - तळेगांव - जवळा - शिरसाळा - टोकवाडी अशी एकूण 23 रेल्वे स्थानके अहमदनगर - परळी या मार्गवर आहेत .

या मार्गावरील महत्वाचे व मोठे पूल 58 पूर्ण झाले आहेत तर छोटे पूल हे 252 पूर्ण झालेले आहेत .

सिग्नलिंग आणि दूरसंचार ची कामे- 10 स्थानके प्रगतीपथावर आहेत

ट्रॅक लिंकिंग चे काम – १२४.३२ ट्रॅक किमी झाला आहे . तसेच पॉवर लाईन क्रॉसिंग चे 91 टक्के काम झाले आहे .

विद्युतीकरण चे काम  261.25 किमी प्रगतीपथावर सुरू आहे.

अहमदनगर ते परळी ही नवीन लाईन पूर्ण झाल्यामुळे मराठवाडा विभागाचा संपर्क सुधारेल. व खऱ्या अर्थाने मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल अशी आशा आहे .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.