जनता महाविद्यालयाचा विद्यापीठात डंका,महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनी चा विद्यापीठ संघात समावेश,

 जनता महाविद्यालयाचा विद्यापीठात डंका,महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनी चा विद्यापीठ संघात समावेश,

--------------------------------



      डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर, यांच्या वतीने कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नळदुर्ग येथे अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा पार पडल्या, यामध्ये जनता कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा ता आष्टी येथील पाच महिला कुस्तीपटू विद्यार्थ्यांचा समावेश होता, यापैकी तीन महिला कुस्तीपटू विद्यार्थिनींनी विजय संपादन करून गोल्ड मेडल प्राप्त केले होते , त्या नुसार त्यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर संघात समावेश झाला, ही बाब महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची व गौरवाची गोष्ट आहे, एकाच महाविद्यालयातून तीन-तीन खेळाडूंचा विद्यापीठाच्या संघात समावेश होणे ही कौतुकाची व अभिमानाची गोष्ट असते,कू संजना डीसले, कु स्नेहल पुजारी, व वेदिका सासणे या विद्यार्थिनींच्या चमकदार कामगिरीने महाविद्यालयास हे यश प्राप्त झाले, काल विद्यापीठाचा संघ चंदिगड विद्यापीठ पंजाब येथे (ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी) आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी रवाना झाला, या वेळी महाविद्यालयाच्या  कुस्तीपटू विद्यार्थिनींना शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा अब्दुल भाई सय्यद, संस्थेचे सचिव मा विजयकुमार बांदल अण्णा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ खांदवे इ टी, व्यवस्थापक विशाल भैया बांदल साहेब, प्रा विक्रम बांदल सर,  आंतरराष्ट्रीय पंच श्री किरण मोरे सर , कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा सय्यद युनुस सर, उपप्राचार्य कर्डीले बी पी सर, महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा राजू गुरसाळी सर, सह प्रा शंकर गाडे सर, अरुण गुंड सर, झुंबर चव्हाण सह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देऊन, विजयी होण्यासाठी निरोप दिला





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.