शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष शरद माखनकर यांचे लोणी ग्रामस्थांनी केले अभिष्टचिंतन

 शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष शरद माखनकर यांचे लोणी ग्रामस्थांनी केले अभिष्टचिंतन



लोणी सय्यदमीर ( बाबु देवकर ) - आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद माखनकर यांच्या वाढदिवसा निमीत्ताने ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या . लोणी सय्यदमीर च्या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राज्यातील विविध ठिकाणी पोलीस, महसूल, शिक्षण, डॉक्टर, बँक, उद्योजक व व्यवसाय अशा क्षेत्रात विविध ठिकाणी कार्यरत असून चांगल्या प्रकारे काम करत आहेत,

संपूर्ण राज्यामध्ये गावातील शाळेचा नावलौकिक तालुक्यात व्हावा, यासाठी पूर्णवेळ काम करणारे अध्यक्ष म्हणुन श्री.शरद माखनकर यांची नेमणूक झाल्यामुळे गावातील शिक्षणासाठी व उद्याचे सजग नागरिक घडवण्यासाठी या नवनिर्वाचित अध्यक्षांचा नक्कीच विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना फायदा होईल, विद्यार्थी घडवत असताना शिक्षकांना येणाऱ्या अडीअडचणीतून मार्ग काढण्यासाठी  अध्यक्ष प्रयत्नशील असतात . पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्या अडचणी सोडवण्यासाठी अविरत कार्य करतील असा विश्वास लोकांना प्राप्त झाला आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अध्यक्ष म्हणून शरद माखनकर हे वेगवेगळी भूमिका बजावत आपले कर्तव्य पाडत असतात शाळेतील वृक्षारोपण विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध प्रकारे त्यांना मदतीचे हेतूने प्रोत्साहित करत असतात. तसेच शाळेतील विद्यार्थी देखील राज्य पातळीवर तसेच जिल्हा पातळीवर देखील विविध खेळ स्पर्धा यामध्ये प्राविण्य घेऊन विजय संपादन करत असतात अशाप्रकारे अध्यक्षपदी माखनकर यांच्या निवडीमुळे लोणी गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात या नवीन अध्यक्षाला व शाळेला एक आदर्श म्हणून पाहिले जात आहे. त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा लोणी येथे साजरा करण्यात आला . याप्रसंगी उपस्थित युवा उद्योजक राजेंद्र पोकळे ,प्रगतशील शेतकरी सतीश आबदार ,लोणी गावचे राजे शंकरराव निंबाळकर , उद्योजक लक्ष्मण चांदगुडे , निलक्रंती ग्रुप चे अध्यक्ष रमाकांत भोसले आदी ग्रामस्थ उपस्थित होते .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.