रामेश्वरदरा सौताडा तसेच आष्टी तालुक्यातील श्री चक्रधर स्वामी संस्थान तीर्थक्षेत्र दर्जास अधिकचा विकासनिधी उपलब्ध करून द्यावा- आ.सुरेश धस

 रामेश्वरदरा सौताडा तसेच आष्टी तालुक्यातील श्री चक्रधर स्वामी संस्थान तीर्थक्षेत्र दर्जास अधिकचा विकासनिधी उपलब्ध करून द्यावा- आ.सुरेश धस



चारा छावणी ऐवजी पशुपालक धारकांना पशूंच्या खाद्याची रक्कम देण्यात यावी...


आष्टी (प्रतिनिधी) बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी पालकमंत्री मा.श्री.धनंजय मुंडे (कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड) यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथे संपन्न झाली.यामध्ये 

पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र श्रीराम देवस्थान "रामेश्वरदरा सौताडा" व आष्टी तालुक्यातील श्री चक्रधर स्वामी संस्थान तीर्थक्षेत्र दर्जा  वाढ करत विकासनिधी उपलब्ध करून द्यावा,यासह अन्य विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावून अधिकचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ.सुरेश धस यांनी केली.

तसेच आष्टी मतदार संघातील डोंगरकिन्ही,थेरला, टाकळसिंग इत्यादी ठिकाणी जिल्हा परिषद हायस्कूल शाळा आहेत त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेतात त्याठिकाणी शाळाखोली व इमारत बांधकाम अत्यावश्यक आहेत, तसेच वजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शाळा खोली बांधकाम करणे आवश्यक आहेत, मतदार संघातील अंगणवाडी खोलीची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.त्यासाठी अधिकचा निधी आपण उपलब्ध करून द्यावा.तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदानाची काही रक्कम मिळाली आहे, परंतु उर्वरित रक्कम दिवाळीपर्यंत खात्यावर जमा करावी. आष्टी मतदार संघात पाहिजे त्या प्रमाणावर सर्वदूर मुबलक पाऊस झालेला नाही, आत्ताही काही भागात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, त्यामुळे, लंम्पि आजाराचे सावट पाहता चारा छावणी ऐवजी पशुपालक धारकांना पशूंच्या खाद्याची रक्कम देत पशुधन सांभाळणे गरजेचे आहे, त्यासाठी प्रशासान स्थरावरून कार्यवाही व्हावी, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा व त्याबाबत येणाऱ्या तक्रारी तात्काळ कार्यवाही करत मार्गी लावाव्यात, शिरुर तालुक्यातील नागरिकांच्या घरकुल बाबतीत तक्रारी आहेत, सर्वसामान्यांना रमाई घरकुल, पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये सहकार्य करून त्यांना लाभ द्यावेत.तसेच सिंदफना प्रकल्पातुन पाणी ओहरफ्लो होऊन वाहून जाणारे पाणी कॅनॉलद्वारे  कापरी नदीमध्ये सोडण्याची विनंती केली.

आष्टी तालुक्यातील कडा धामणगाव व आष्टी शहरात सोने व्यापारी यांच्या बाबतीत बाहेरच्या जिल्ह्यातील पोलिस अधिकारी येऊन चुकीच्या पद्धतीने कार्यवाही करत,व्यापाऱ्यांकडुन चुकीच्या प्रकारे वसुली करत आहेत.याची स्थानिक पोलिस प्रशासनास कल्पना नाही,याबाबत जिल्हा पोलिस प्रशासनाने कार्यवाही करावी.जिल्ह्यात PMEGP, CMEGP या रोजगार निर्मिती, कौशल्य विकास व अर्थसहाय्य योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी बँकेचे लोक सकारात्मक नाहीत, यासाठी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी लक्ष घालावे अशी ही विनंती आ.सुरेश धस यांनी केली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.