पिंपळा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा

 पिंपळा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा



परमपूज्य सद्गुरू वै. नाना महाराज पिंपळेकर यांचे शिष्योत्तम मठाधिपती ह भ प नारायण महाराज वाळके यांनी विश्वआनंद भुवन पिंपळा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा आयोजित केला होता. या दिंडी सोहळ्यामध्ये ह भ प नारायण महाराज वाळके गेल्या पाच दिवसापासून अन्न आणि पाण्याचा संपूर्ण त्याग करून पाण्याचा थेंब ही न घेता....पंढरपूर तीर्थ क्षेत्र जवळपास दोनशे किलोमीटर रखरखत्या उन्हामध्ये  पोहचत आहेत.

गेल्या काही वर्षापासून महाराज अतिशय कठोर तपश्चर्या करत आहेत.

अनेक वर्षापासून ते 24 तासामधून एकदाच जेवण करतात. पुन्हा चहा,दूध काहीही घेत नाहीत.

घर, प्रपंच सर्व गोष्टींचा संपुर्ण त्याग करून आयुष्य फक्त ईश्वरचिंतनामध्येच घालण्याचा त्यांनी मनोदय केलेला आहे. कपड्यावर कसल्याही प्रकारचा खिसा न ठेवता....

महाराज कसल्याही पैशाला हात लावत नाहीत.

सद्गुरु नाना महाराजांच्या आत्यंतिक सहवासातून महाराज, किर्तन, प्रवचन करतात.

गेली चार-पाच दिवस पाण्याचा घोटही न घेता चालू असलेली त्यांची पाई वारी विषयी विचारता.... त्यांनी सांगितले की..

भगवंताचा आशीर्वाद आसेल तर सर्व काही शक्य आहे फक्त अंतकरणातून भक्तीभाव आणि तपश्चर्या केली पाहिजे. ईश्वरप्राप्तीसाठी निर्विकार भाव, विश्वकल्याण विचार. आणि शुद्ध अंतकरणातून देवाची प्रार्थना, भक्ती केली की जीवनाचा आनंद मिळतो,देव प्राप्त होतो.

घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे....

आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा.

 हभप नारायण महाराज वाळके यांचे महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात शिष्य मंडळ आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.