शासकिय अधिकार्यांनी दखल न घेतल्यास आंदोलक उद्या रस्तारोको करणार..
----------------------------------
प्रा.दादा विधाते यांच्या आमरण उपोषणाला आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉ महेश नाथ यांच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला.
आष्टी तालुक्यातील पिंपळा गावातील गेल्या तीन वर्षांपासून एकही शासकीय अधिकारी कामावर रुजू न झाल्याने समाजसेवक प्रा.दादा विधाते यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता.
आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे परंतु एकही अधिकारी उपोषणकर्त्याला भेटण्यास आले नसल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे.
आज दिनांक २२ ऑक्टोबर रोजी विविध पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून उपोषणकर्ते दादासाहेब विधाते हे आमरण उपोषणास बसल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे.परंतू एकही शासकीय अधिकारी उपोषणकर्ते यांना भेटण्यासाठी आले नाही. तरी या शासकीय अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेतली नाही तर उद्या नगर बीड रोड नांदुर फाट्यावर सर्व मित्र पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी अशी माहिती आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉ महेश नाथ यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे.
यावेळी शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष,युवा मल्हार सेना सह सर्व मित्र पक्षाच्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे.


stay connected