रस्ते निर्मिती हा जनतेच्या विकासाचा राजमार्ग ठरत असतो ,आ.सुरेश धस यांचे प्रतिपादन

 " रस्ते निर्मिती हा जनतेच्या विकासाचा राजमार्ग ठरत असतो "
आ.सुरेश धस यांचे प्रतिपादन 

******************************

आमदार सुरेश धस यांचा विकास कामांचा मतदारसंघात धडाका...

******************************






 

******************************

आष्टी (प्रतिनिधी)

गाव असो अथवा शहर यांना जोडणारे रस्ते निर्मिती करणे म्हणजे त्या परिसरातील जनतेच्या विकासाचा राजमार्ग निर्माण करणे  आहे असे प्रतिपादन आ. सुरेश धस यांनी केले..

       राज्यमार्ग क्र.५७ ते करंजी किंमत २.०० कोटी रू. पांढरी ते जामगाव किंमत २ कोटी ५० लक्ष रू. आणि डोईठाण फाटा ते बावी फाटा ,खडकत चौक ते चिखली फाटा बळेवाडी फाटा ते खडकत या १०.०० कोटी रु. किमतीच्या या रस्ता कामांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते..

यावेळी करंजी येथे व्यासपीठावर जि. प. सदस्य अमरराजे निंबाळकर, पोपट आजबे, उपअभियंता शिवाजी सानप, शाखा अभियंता सौदागर साहेब, संजय मुळे,विनोद रोडे तर पांढरी येथे व्यासपीठावर जालिंदर वांढरे,सरपंच सुधीर पठाडे,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,सरपंच ढवळे फौजी,ठेकेदार डोंगरे तर आष्टी येथे व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष दत्ता भाऊ काकडे,नगराध्यक्ष जिया बेग,सभापती बद्रीनाथ जगताप,गणेश शिंदे,सुनील मेहेर,नितीन मेहेर आदी उपस्थित होते.

       करंजी,पांढरी आणि आष्टीतील झालेल्या या विविध रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते पुढे म्हणाले की, करंजी येथील मुळे वस्ती या ग्रामस्थांचा अनेक दिवसाची मागणी असल्याने आपण हा रस्ता मंजूर करून घेतला असून याने शेतकऱ्यांच्या शेतमालाला घेऊन जाण्यासाठी चालला मिळणार आहे. पांढरी ते जामगाव हा महत्त्वपूर्ण रस्ता असून आपण जिल्हा परिषद सदस्य असताना ग्रामीण मार्ग म्हणून या रस्त्याची सुधारणा केली होती आणि या रस्त्याचा निधी ग्रामीण मार्ग असून देखील निधी उपलब्ध करून देण्याचे मोठे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. या रस्त्यामुळे जामगाव येथून जामखेड कडे जाण्यासाठी पाच किलोमीटर अंतर कमी होत आहे या रस्त्यामुळे पांढरी आणि जामगाव या दोन्ही गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दळणवळणाच्या सोयी निर्माण होणार आहेत मात्र रस्त्याचा विकास करताना सर्वसाधारणपणे सर्व ठिकाणी शेतकऱ्यांना रस्ते शासकीय रस्ते आपल्या मालकीचे वाटतात आणि ते आपापले उकंडे आणि गोठे या रस्त्याच्या कडेला निर्माण करतात परंतु रस्ता हा दर्जेदार करण्यासाठी आणि अंदाजपत्रकाप्रमाणे रुंद करण्यासाठी कोणाचाही मुलही जा न ठेवता अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवावीत असे सांगताना त्यांनी याबाबत शेतकऱ्यांनी शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन केले पंचायत समिती कार्यालयाद्वारे मुक्त गाय गोठा योजना योग्य लाभार्थी निवडण्यात यावेत कारण शेतीला पूरक असलेला दुग्ध व्यवसाय आता तरुणांनी हाती घ्यावा आणि आपला आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्याची गरज असल्याची त्यांनी सांगितले आष्टी तालुका दूध उत्पादक संघ दोन वेळा दूध संकलन करत असल्यामुळे शेतकऱ्यांना ज्यादा दर मिळत असून अल्पावधीमध्ये दूध संकलन ८७ हजार लिटर पर्यंत वाढले असल्याचे त्यांनी यापुढे शेतकऱ्यांनी संकरित गाईंचे चांगल्या पद्धतीचे सिमेंट वापरून सेक्स सॉर्टेड सिमेंट वापरून केवळ कालवडी चे उत्पादन होत असते याबाबतची जागृती करावी आपला स्वतःचा राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मंजूर पांढरी ते आंधळेवाडी रस्त्यावरील असलेला  गाईचा गोठा हा पथदर्शी असून या ठिकाणी असणाऱ्या गाई आणि दूध उत्पादनाचा अभ्यास परिसरातील शेतकऱ्यांनी करावा असे आवाहनही त्यांनी घ्यावी केले तसेच आपल्या भागामध्ये पाऊस कमी आहे परंतु ज्या भागांमध्ये पाऊस जादा आहे तेथील संबंधित पाहुणे आणि नातेवाईक यांना मक्याचे पीक घेऊन आगामी काळामध्ये जनावरांना चारा कमी पडू शकतो याची शक्यता घेऊन मका उत्पादन करून मुरघास निर्मिती करावी जेणेकरून संभाव्य दुष्काळग्रस्त परिस्थितीला शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना तोंड देता येईल यासाठी उपाययोजना करण्यात यावी असे आवाहनही त्यांनी त्यावेळी केले आष्टी येथील रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते म्हणाले की, आष्टी ते खडकत हा रस्ता चार किलोमीटर अंतरापर्यंत असलेला अत्यंत खड्डेमय झाला असल्यामुळे परिसरातील गावांना जाणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन दर्जेदार रस्ता राज्य रस्ता दर्जाचा हा रस्ता होणार असल्यामुळे यापुढे नागरिकांना सुविधा मिळणार आहेत असे सांगितले लवकरच चिखली फाटा ते चिखली या रस्त्याला देखील मंजुरी मिळाली असून चिखली गावापर्यंत देखील अत्यंत चांगला असा रस्ता मंजूर काम मंजूर झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले डोईठाण ते आष्टी आणि आष्टी ते खडकत या रस्त्यावरील काही किलोमीटर अंतराचे काम हे विद्यमान आमदारांनी मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी तिन्ही रस्त्याच्या वरती असलेल्या करंजी, हाजीपुर,जामगाव, सोलेवाडी,खडकत,टाकळशिंग,पारगाव जो., चिखली,वाळुंज,तवलवाडी,बळेवाडी या गावातील प्रमुख नागरिक तसेच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.