वाळुंज येथील ॲट्रॉसिटी गुन्ह्याची संपूर्ण चौकशी व्हावी -आ.सुरेश धस यांची मागणी
आष्टी (प्रतिनिधी )
वाळुंज येथील कथित ॲट्रॉसिटी गुन्ह्यामधील दाखल झालेल्या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी
आ.सुरेश धस यांनी केली आहे
याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की,
मी गेली २५ ते ३० वर्षे राजकीय जीवनामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीवाद अथवा जातीभेद केलेला नाही सर्व जातीय, सर्व धर्मीय लोकांमध्ये माझा वावर असून..
आदिवासी, दलित या लोकांसाठी मी अत्यंत प्रामाणिकपणे विकासा साठी काम केलेले आहे वाळुंज येथील घटना संपूर्णपणे खोटी असून या घटनेमागे " बोलवता धनी " वेगळाच आहे..
या ठिकाणी काढण्यात आलेले व्हिडिओ तोडमरुड करण्यात येऊन दाखवण्यात आलेले आहेत..
या घटनेमध्ये कुठलाही तथ्यांश नाही त्यामुळे पोलीस विभागाला हा गुन्हा दाखल करावा असे सांगितलेले आहे..
पोलीस विभागाने यामध्ये सखोल चौकशी करून फॉरेन्सिक लॅब मध्ये या व्हिडिओ चे संभाषण आणि आणि घटनाक्रम तपासून याची घटनेची कसून चौकशी व्हावी आणि तथ्यांश जनतेसमोर तात्काळ यावे असे माझे आव्हान आहे त्यांनी शेवटी सांगीतले


stay connected