विद्यार्थ्यांना गणित विषयाची भीती दूर करण्याकरिता राबवली जाते गणिताची स्पर्धा परीक्षा- स्वराज्य फाउंडेशन बीड चा उपक्रम.

 विद्यार्थ्यांना गणित विषयाची भीती दूर करण्याकरिता राबवली जाते गणिताची स्पर्धा परीक्षा- स्वराज्य फाउंडेशन बीड चा उपक्रम.



तालुका प्रतिनिधी/केज 


बीड जिल्हातील विद्यार्थ्यासाठी स्वराज्य फाउंडेशन बीड हे गेल्या 8 वर्षा पासून गणित विषयाची गणित बुद्धिमत्ता चाचणी ही स्पर्धा परीक्षा हा उपक्रम राबवत आहे.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना गणित विषयाची भीती दूर होऊन विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण होते .या परीक्षा मधून नंबर येणाऱ्या विद्यार्थ्यास वेगवेगळ्या पद्धतीचे बक्षीस मिळतात एज्युकेशन टॅब,सायकल,कॉम्पुटर ,किड्स लॅपटॉप,रोख रक्कम  हे बक्षीस मिळवण्याच्या दृष्टीने विद्यार्थी लक्ष देऊन अभ्यास करतात त्या मुळे विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण होते. 

विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षाचे महत्व त्याच बरोबर व्यवरिक ज्ञान कळण्यासाठी या परीक्षेचे आयोजन केले आहे असे आयोजकांनी सांगितले .ही  परीक्षा बीड जिल्यातील प्रत्येक तालुक्यात राबवली जाते व कोणत्याही माध्यमाचा व कुठल्याही शाळेचा विद्यार्थी या परीक्षेस सहभाग घेऊ शकतो या परीक्षेचे बक्षीस वितरण हे 15 ऑगस्ट रोजी ज्या शाळेतील विद्यर्थ्याचा नंबर आला त्या शाळेत झाले. या वर्षी पण ज्या विद्यार्थ्यांना सहभाग घ्यायचा आसेल त्या साठी नोंदणी सुरू आहे असे आयोजकांनी सांगितले आहे.


पालक प्रतिक्रिया .


माझा विद्यार्थी गेल्या 5 वर्षा पासून या परीक्षेस सहभाग घेत आहे .या गणित विषयाच्या परीक्षे मुळे माझ्या मुलाचा गणित विषयाचा पाया भक्कम झाला व त्याला गणित विषयाची आवड निर्माण झाली.


पालक 

भाऊसाहेब बाबासाहेब शिंदे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.