ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले

 ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले



जानेवारी २३ नंतर मुदत संपलेल्या राज्यातील २३५९ सार्वत्रिक आणि ३०८० पोट निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला.जानेवारी २३ नंतर मुदत संपलेल्या राज्यातील २३५९ सार्वत्रिक आणि ३०८० पोट निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने कार्यक्रमा जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी शुक्रवार (ता. २०) पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख असून रविवारी (ता. पाच नोव्हेंबर) रोजी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी ता. सहा नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्यातील पहिल्या टप्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपल्यानंतर जानेवारी २०२३ नंतर दुसऱ्या टप्यातील अनेक ग्रामपंचायतीची मुदत संपली होती. मुदत संपून नऊ महिने उलटले असतानाही या निवडणुका झाल्या नाहीत. अखेर निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्यातील दोन हजार ३५९ सार्वत्रिक तर, तीन हजार ८० रिक्त जागेवरील पोटनिवडणुक अशा एकूण पाच हजार ४३९ ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.


असा आहे निवडणूक कार्यक्रम


नामनिर्देशपत्र दाखल करण्याचा दिनांक - सोमवार (ता. १६)


• नामनिर्देशपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक - शुक्रवार (ता. २०)


• नामनिर्देशपत्र छाननी दिनांक, सोमवार (ता. २३)


• नामनिर्देशपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक, बुधवार (ता. २५) वेळ दुपारी ३ पर्यंत


निवडणूक चिन्ह वाटप दिनांक- बुधवार (ता. बुधवार) दुपारी ३ नंतर


• मतदान दिनांक - रविवार (ता. पाच नोव्हेंबर)


मतमोजणी दिनांक - सोमवार (ता. सहा नोव्हेंबर)







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.