प्रत्येक शेतकऱ्यांनी बँक खाते के वाय सी अपडेट करून घ्यावे --आ. बाळासाहेब आजबे .

 प्रत्येक शेतकऱ्यांनी बँक खाते के वाय सी अपडेट करून घ्यावे --आ. बाळासाहेब आजबे .




कडा/प्रतिनिधी.

जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे बँकेमध्ये खाते उघडले आहेत परंतु त्या खात्यांना बँकेच्या नियमाप्रमाणे  के वाय सी अपडेट करणे गरजेचे आहे आणि खाते अपडेट नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्र शासनाचे वराज्य सरकारचे इतर योजनेचे पैसे जमा होत नाहीत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपले खाते केवीसी झाले आहे का नाही ते बँकेत जाऊन तपासून पहावे व आपले खाते  अपडेट करून घ्यावे असे आवाहन आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

       केंद्र सरकारचे व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमधील अनुदान व काही रोख रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असते त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी दोन-तीन महिन्याला बँकेत जाऊन आपल्या खात्यावरील रक्कम व आपले खाते अपडेट आहे का नाही या संबंधित चौकशी करणे आवश्यक आहे बँकेतील खाते  अपडेट नसल्यास रक्कम जमा होत नाही त्यामुळे संबंधित विभागाकडून पैसे वर्ग करूनही बँकेत जमा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते हा गोंधळ टाळण्यासाठी कृषी अधिकारी गोरख तरटे व बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे खाते केवायसी अपडेट नसल्याचे समोर आले त्यामुळे हा गोंधळ टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते येत्या आठ दिवसांमध्ये बँकेमध्ये जाऊन  केवायसी अपडेट करून घ्यावे असे आव्हान आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी केले आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.