विवाह इच्छुक मुलींची संख्या भरपूर आहे, संवाद कमी पडतो... म्हणून वधु वर परिचय मेळावा आयोजन.- ॲड.सीताराम पोकळे, पत्रकार.

 विवाह इच्छुक मुलींची संख्या भरपूर आहे, संवाद कमी पडतो... म्हणून वधु वर परिचय मेळावा आयोजन.- ॲड.सीताराम पोकळे, पत्रकार.



        शहराप्रमाणे ग्रामीण भागातही लोकांचे जीवन धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे नातेवाईक, भाऊ -भाऊ यांच्यातील संवाद कमी झालेला आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्यामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त झाली आहे. परिणामी आपल्या मुला मुलींचे विवाह जुळवताना त्यांना आपापल्या क्षेत्रातील जोडीदार शोधणे कठीण झालेले आहे. खरे पाहता समाजामध्ये विवाह इच्छुक मुलींची संख्या भरपूर आहे. परंतु मुलींच्या पालकांच्या अवाजवी अपेक्षा व आपापसात कमी असलेला संवाद यामुळे विवाह सहजासहजी जुळत नाहीत. म्हणून कडा येथे वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मराठा वधू वर कक्षाचे कार्याध्यक्ष ॲड. सीताराम पोकळे यांनी पत्रकारासोबत बोलताना दिली.



      पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्याच शहरात व गावात अनेक विवाह इच्छुक व अनुरूप स्थळे असूनही आपल्याला ते माहीत नसतात. त्याचे एकमेव कारण म्हणजे आपला जनसंपर्क व संवाद नसणे. म्हणून मराठा सेवा संघ प्रणित वधु वर सुचक कक्ष आष्टी च्या वतीने मराठा वधु वर परिचय मेळावाआयोजित करण्यात आला आहे. सदर मेळावा रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी परमेश्वर मंगल कार्यालय कडा , तालुका आष्टी, जिल्हा बीड येथे सकाळी दहा वाजता सुरू करण्यात येणार आहे.

      या मेळाव्यात मराठा समाजातील सर्व विवाहयोग्य मुले मुली आणि पालक यांनी कुठलाही संकोच न बाळगता सहभागी व्हायचे आहे. ज्यामुळे आपण समाजबांधवासोबत आणि योग्य त्या व्यक्तीसोबत संवाद साधू शकणार आहोत. वधू-वरासाठी शेकडो स्थळे उपलब्ध होण्यासाठी इच्छुक वधु -वर यांचे पालक ,नातेवाईक यांनी अपेक्षासह बायोडाटा व फोटो संयोजकाकडे लवकरात लवकर पाठवावेत जेणेकरून नियोजन योग्य वेळेत करता येईल. अधिक माहितीसाठी शिवाजीराव पाचे 940 32 692 33 किंवा ॲड. सिताराम पोकळे (पत्रकार) 94 21 63 80 55 व 96 999 25 710 किंवा मराठा सेवा संघाच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी संपर्क करावा असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.

............................................

 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.