भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीवर अभिजीत शेंडगे

 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीवर अभिजीत शेंडगे 

******************************



******************************

आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया गावचे सुपुत्र व लोकनेते आ.सुरेश धस यांचे अत्यंत विश्वासू आणि खंदे समर्थक असणारे धडाडीचे युवा कार्यकर्ते अभिजित शेंडगे यांची

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड केली आहे.

        अभिजित शेंडगे हे कुशल संघटक आहेत. त्यांना पक्षीय संघटनात्मक कार्याचा दीर्घकालीन अनुभव आहे.सध्या ते आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली स्व.गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड मजूर संघटनेच्या राज्य प्रवक्तेपदी उत्तम रीतीने काम पार पाडत आहेत.ऊसतोड मजुरांच्या मुलाला आ.सुरेश धस यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकारणी सदस्यपदी निवड केल्याने एका सर्वसामान्य मजुराच्या मुलाला ही संधी मिळाल्याने त्या संधीचं नक्कीच सोनं केल्याशिवाय अभिजीत शेंडगे राहणार नाही तर येणाऱ्या काळात त्यांच्यावर पक्षाने अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्यामध्ये बूथ सशक्तीकरण अभियान राबविणे, सरल अॅप चे काम पूर्ण करणे,निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटना बळकट करणे,भारतीय जनता पार्टीने मागील काळात केलेल्या सर्व विकासात्मक कामे तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवणे हे काम त्यांचे असणार आहे.

       देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्याचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे,युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाला ताकद मिळवून देण्यासह पक्षाची ध्येय धोरणे विचार तथा पक्षाचे काम तळागळातील सर्व सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काम करेल

असा विश्वास या निवडीनंतर युवा कार्यकर्ते अभिजित शेंडगे यांनी व्यक्त केला आहे.

       भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे,आमदार सुरेश धस,युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर,युवा नेते जयदत्त धस जि. प.सदस्य माऊली जरांगे,सामाजिक कार्यकर्ते गणेश शिंदे,जि. प.रामहरी महारनोर,नगराध्यक्ष जिया बेग,नगराध्यक्ष राजू जाधव,ऊसतोड संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सानप, डॉ.पांडुरंग चौधरी, पत्रकार प्रविण पोकळे आदिसह आष्टी,पाटोदा, शिरूर मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी,टाकळी ग्रामस्थांसह सर्व स्तरातून अभिजित शेंडगे यांचे अभिनंदन होत असून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.