भारतीय सा. व सां. मंचाच्या गोवा प्रदेशाध्यक्षा पदी रेखा पौडवाल' यांची निवड .
नवोदित लेखकांसाठी हक्काचे व्यासपीठ असणा-या भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचा कडे नवोदित लेखकांचा ओढा वाढत आहे. ही संस्था नेहमीच नवोदित लेखकांकरीता वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा, मार्गदर्शन शिबीरे आयोजित करत असते. याच गोष्टींची दखल घेत नवोदित लेखक वर्ग भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाला पसंती दर्शवत आहे. हीच बाब महाराष्ट्राबरोबरच गोवा राज्यातही लक्षात घेता संस्थेच्या वतीने तळागाळातील नवोदित लेखकांना या प्रवाहात सामील करून घेण्याकरीता गोवा राज्यातील नियुक्त्या करण्यात येत आहेत. याच अंतर्गत गोवा प्रदेश कार्याध्यक्ष पदी रेखा पौडवाल यांची निवड करण्यात आली
तुषार पालखे यांचे भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचे संस्थापक अध्यक्ष विशाल सिरसट, उपाध्यक्ष विजय जायभाये, कार्याध्यक्षा शिल्पा मुसळे, चैताली कापसे, छाया देसले, योगेश हरणे आणि सर्व पदाधिका-यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.


stay connected