वाळुंज येथील कथित ॲट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये प्राजक्ता धस यांना गोवण्याचे कुटील कारस्थान ..
आष्टी (प्रतिनिधी) दि.15 ऑक्टोबर 2023 रोजी वाळुंज येथील कथित ॲट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये माझ्या पत्नी प्राजक्ता धस यांना अडकवण्याचे कुटिल कारस्थान रचले गेले असून.. यातील प्रसार माध्यमांमध्ये जोडतोड करून दाखवल्या गेलेल्या व्हिडिओ चित्रफितींचा वेळ आणि घटनाक्रम यांचा सायबर सेल आणि फॉरेन्सिक लॅब द्वारा अत्यंत बारकाईने तपास होण्याची आवश्यकता आहे.. त्यातून वस्तुस्थिती बाहेर येणारच आहे..
तथापि,हा माझ्या पत्नी प्राजक्ता धस यांना या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठीच हा उपद्व्याप करण्यात आलेला आहे..
या घटनेमागे बोलविता धनी कोण आहे ?
याचा शोध घ्यावा अशी मागणी आ.सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.. आष्टी येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते..
ते पुढे म्हणाले की,
दि.15 ऑक्टोबर 20 23 रोजी घटना घडली आणि त्याची फिर्याद 21 ऑक्टोबर 2023 रोजी ऑनलाइन पध्दतीने दाखल करण्यात आली ..या मधल्या काळामध्ये काय काय घडवले गेले ?
याचा शोध व्हावा
कारण दि. 15 ऑक्टोबर रोजी आष्टी पोलीस ठाण्याच्या डायल 112 या मोबाईल व्हॅन ला एका फोन द्वारे संपर्क करण्यात आला ती वेळ दुपारी 3.30 वाजताची होती या कालावधीमध्ये वाळुंज येथील रघुनाथ पवार हे बटईने करत असलेल्या शेत जमिनीतील मका घेऊन जात असलेल्या त्या लोकांशी वादविवाद झाल्यानंतर 4.10 वा. या वेळी रघुनाथ पवार यांनी धोका लक्षात घेऊन प्राजक्ता धस यांना फोन करून आपला जीव धोक्यात असल्याची माहिती दिली त्यानंतर प्राजक्ता धस यांनी आष्टी पोलीस स्टेशनचे त्या भागातील बीटअंमलदार नवनाथ काळे आणि संतोष दराडे यांना फोन करून सांगितले ..यावेळी हेतू पुरस्सर काढण्यात आलेल्या व्हिडिओमधील जे चित्रीकरण दाखवण्यात येत आहे ते चित्रीकरण दु.3.30 ते 4 .10 या दरम्यानचे आहे ..4.10 ते 4.25 पर्यंत आष्टी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना दोन वेळा फोन करण्यात आला आणि काहीतरी घटना घडण्याची शक्यता आहे तुम्ही काहीतरी करा..
असे सांगितले त्यानंतर रघुनाथ पवार यांना पोलीस येत आहेत असे सांगितले परंतु त्यांचा फोन बंद होता 4.45 वाजता प्राजक्ता धस आणि आष्टी पोलीस स्टेशनचे कर्मचारी बरोबरच त्या ठिकाणी पोहोचले यावेळी या लोकांनीच केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणातील तीन वेगवेगळे व्हिडिओ मधील संभाषण व्हिडिओ त्या लोकांनीच केलेले आहेत हे व्हिडिओ रघुनाथ पवार किंवा इतर यांच्यावतीने करण्यात आलेले नाहीत.. तसेच या ॲट्रॉसिटी प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी राहुल माणिक जगदाळे याला ही घटना समजताच तो घटनास्थळी पोहोचेपर्यंत डायल 112 मोबाईल व्हॅन मधील पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे आणि काही कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचलेले होते..
त्यावेळी दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांशी बोलून हा विषय संपवला होता परंतु या प्रकरणातील त्या दिवशी काढलेले तीन वेगळे वेगळे व्हिडिओ चित्रीकरण करून या चित्रफिती जोडतोड करताना.. घटनाक्रमाप्रमाणे असलेल्या तीन चित्रफिती खालच्या..वर आणि उलट्या पालट्या क्रमाने सोयीस्कर रीतीने जोडतोड करून नियोजनबद्ध पद्धतीने एडिटिंग केलेल्या करून व्हायरल केलेल्या आहेत ..
प्राजक्ता धस या त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी
घटना घडून गेलेल्या आहेत व्हिडिओ हे कटछाट करून दाखवले आहेत..
या सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग ची शास्त्रोक्त पद्धतीने कधी ? केव्हा ? किती वेळ ? कुठे ? तयार केल्या आहेत याचा सायबर कायद्यानुसार ..
तपास करण्याची आवश्यकता आहे..
दि 15/10/ रोजीच्या या प्रकरणातील कथित, पीडित लोक त्यानंतर सायंकाळी आष्टीतील सरकारी दवाखान्यात गेले आणि तेथून थेट अहमदनगर कडे गेल्याचे समजते..
तिकडे त्यांना कोणी बोलावले ?
चित्रफिती कोणाच्या मोबाईल वरून व्हायरल करण्यात आल्या ?
कोणी फॉरवर्ड केल्या ? ऑनलाइन फिर्याद देताना ॲपवर माहिती भरताना अशा प्रकारची तांत्रिक माहिती भरणे हे अडाणी आदिवासी असलेल्या पीडित लोकांना शक्य आहे असे वाटत नाही त्यामुळे माझ्या राजकीय कारकीर्दीला आणि माझ्या कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी हा प्रयत्न झालेला आहे अशा पद्धतीने एखाद्या गोरगरीब समाजाला हाताशी धरून कुटिलकारस्थान करणाऱ्यांची तसेच या घटनेतील मास्टरमाईंड असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.. अशाच प्रकारची तक्रार मागील काही दिवसांपूर्वी रघुनाथ पवार आणि राहुल जगदाळे यांच्या विरुद्ध याच मंडळींनी केली होती त्याचाही तपास आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत त्यांनी या घटनेचा तात्काळ तपास लावून अंतिम अहवाल तयार केला असता तर ही घटना घडली नसती आणि खोटे गुन्हे दाखल करण्याला आळा बसला असता असे त्यांनी शेवटी सांगितले..
या ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील तीन वेगवेगळ्या व्हिडिओचे पत्रकारांनी अवलोकन केले असता ..
एका चित्रफितीमध्ये मोबाईल शूटिंग करताना कोणीतरी.. "अब्रू घेतली.. म्हण अब्रू घेतली म्हण.." असे म्हणत असून.." तू त्याला धर " असे संभाषण दिसत असून दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पीडित महिला आपल्या अंगावरील कपडे स्वतः च उतरवताना दिसत आहे..
तर तिसऱ्या एका व्हिडिओमध्ये पीडित महिला रघुनाथ पवार यांचे मागे जोरदार पणे धावत असल्याचे दिसत आहे..



stay connected