इंद्रायणी विद्या मंदिरच्या प्रा. गणेश म्हस्के यांना पीएचडी

 इंद्रायणी विद्या मंदिरच्या प्रा. गणेश म्हस्के यांना पीएचडी



पुणे - इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च बी. फार्मसी महाविद्यालयातील प्रा. गणेश म्हस्के यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. एस. व्ही. डी. यू. बडोदा, गुजरात या विद्यापीठातून त्यांनी 'डिझाइन, सिंथेसिस, कॅरेक्टेरीजेशन अँड बायोलॉजिकल एव्हलूशन ऑफ सम नोवेल हेटेरोसायकलिक क्विनोलिन डेरीव्हेटिवज' या विषयात आपला शोधनिबंध सादर केला आहे. या शोधप्रबंधासाठी बडोदा येथील डॉ. धन्या बी. सेन, डॉ. असीम सेन, डॉ. आशिष शहा व डॉ. राजेश माहेश्वरी यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे. विश्वस्त निरूपा कानिटकर, सर्व पदाधिकारी संस्थाचालक आणि इंद्रायणी विद्या मंदिर परिवारातील शाळांमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य सर्वांच्या वतीने डॉ. म्हस्के यांना शुभेच्छा दिल्या. प्रा गणेश म्हस्के हे आष्टी तालुक्यातील धानोरा येथील रहिवाशी आहेत . धानोरा पंचक्रोशीतुनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.