शतकोत्तर इतिहास असलेली नगरची अर्बन बँक इतिहासजमा : RBI ची मोठी कारवाई

 

शतकोत्तर इतिहास असलेली नगरची अर्बन बँक इतिहासजमा : RBI ची मोठी कारवाई



तेजवार्ता  वृत्त सेवा अहमदनगर : - भारतीय रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची मान्यता रद्द केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात जुनी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची मान्यता रद्द केली. तसेच प्रशासक नेमून बँकेवर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची आरबीयकडून माहिती देण्यात आली. याबाबत आरबीआयने  दि . ०४ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता बँकेला मेल पाठवला. पुरेसे भांडवल आणि कमाईची फार कमी शक्यता, असे आरबीआयने कारवाईमागचे कारण सांगितले.
आरबीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे की, अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नाही. यामुळे बँकींग नियमन कायदा १९४९ चे कलम ५६ सह कलम ११ (१) आणि कलम २२ (३) (ड) च्या तरतुदींचे पालन होत नाही. बँकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. बँक त्यांच्या ठेवीदारांना ठेवींच्या पूर्ण रक्कम देण्यास असमर्थ आहे. बँक चालू ठेवल्यास सार्वजनिक हितावर विपरीत परिणाम होईल. यामुळे बँकेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेला यापुढे ठेवी स्वीकारणे किंवा ठेवींची परतफेड करता येणार नाही.
प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवींची ५ लाखाच्या आर्थिक मर्यादेपर्यंत ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार असेल. कायदा, १९६१ च्या तरतुदींनुसार बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार ९५.१५ टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम डीआयसीजीसीकडून मिळण्याचा अधिकार आहे, अशी माहिती आरबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी दिली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.