परमेश्वर काका शेळके यांची मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या आष्टी तालुकाध्यक्ष पदी निवड
आष्टी ( प्रतिनिधी ) - आष्टी पंचायत समिती सदस्य परमेश्वर काका शेळके यांची मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली . गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार यांचे कट्टर निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परमेश्वर काका शेळके सुपरिचीत आहेत . १९७८ पासून शरद पवार साहेबांशी एकनिष्ठ राहुन परमेश्वर काका हे त्यांचे विचार सर्वसामान्य जनतेत पोहचविण्याचे काम सातत्याने करत असतात . २० वर्षे सलग धानोरा गावच्या सरपंचपदी ते कार्य करत होते . १० वर्षे पंचायत समितीच्या सदस्यपदी कार्यरत होते . आष्टी तालुका दुध उत्पादक संघाच्या संचालक आणि चेअरमन पदीही ते १० वर्षे कार्यरत होते . ३५ वर्षांपासून धानोरा ग्रामपंचायत चा कारभार ते समर्थपणे सांभाळत आहेत .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब भाई यांच्या मार्फत मा आ . संदीप भैय्या क्षिरसागर (अध्यक्ष बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ) यांच्या हस्ते परमेश्वर काका शेळके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली . याप्रसंगी माजी आ. साहेबराव दरेकर नाना , माजी आमदार शेख सलीम , सुशिला ताई मोराळे , अॅड बागल साहेब, शिवभूषण जाधव , सागर ढोबळे , डॉ . राज शेख , देविदास उदावंत , राहुल शेळके , अशोक म्हस्के ,पांडुरंग चव्हाण तसेच परळी , माजलगाव , केज, बीड , गेवराई , वडवणी , पाटोदा , शिरूर ,अंबाजोगाई , धारूर या सर्व तालुक्याचे अध्यक्ष व पदाधीकारी उपस्थित होते . यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय बीड येथे परमेश्वर काका शेळके यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी शेरी चे सरपंच संजय थोरवे यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली .



stay connected