जेष्ठ पत्रकार अनिलभाऊ लगड यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराकडून सत्कार

 जेष्ठ पत्रकार अनिलभाऊ लगड यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराकडून सत्कार



बीड व अहमदनगर जिल्ह्यात पत्रकारीतेच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटविणारे जेष्ठ पत्रकार अनिल भाऊ लगड यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला . काल वाढदिवसा निमीत्ताने विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी व मित्रपरिवाराने दिवसभर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला . त्यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने आज धानोरा येथे तेजवार्ता कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी तेजवार्ता चे संपादक सय्यद बबलूभाई , उपसंपादक महादेव वामन , शेख हमजान , अशोक अडागळे तसेच शेतकरी कामगार पक्षाचे आष्टी मतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव सुरवसे , हभप बाळनंद महाराज , सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके , माजी सरपंच राजाभाऊ शेळके, संदीप जाधव , अनिल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते . पत्रकार अनिलभाऊ लगड हे हिवरा येथील रहिवाशी असुन अनेक वर्षांपासून ते दैनिक लोकमत वृत्त समूहात संपादक पदावर कार्यरत होते . सध्या ते अहमदनगर च्या सकाळ वृत्तपत्रात वरीष्ठ उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत . त्यांनी आपल्या लेखणीने विवीध वंचीत उपेक्षितांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली व त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले . त्यांच्या शांत संयमी ' मनमिळावू व हसतमुख स्वभावामुळे सर्वच क्षेत्रात त्यांचा मोठा मित्र परिवार आहे . तेजवार्ता परिवारतर्फे अनिलभाऊ लगड यांना सुख , संमृद्धी व आरोग्यदायी दिर्घायुष्य लाभो याच सदिच्छा .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.