एफआरपीपेक्षा अधिक भाव देणार - बजरंग सोनवणे* *येडेश्वरी साखर कारखान्याचा १० वा बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न

 *एफआरपीपेक्षा अधिक भाव देणार - बजरंग सोनवणे*



*येडेश्वरी साखर कारखान्याचा १० वा बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न*

---------------------


केज (प्रतिनिधी) - 

येडेश्वरी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ या वर्षाचा १० वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शनिवार  दिनांक २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.४१ वाजता.  येडेश्वरी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रारंभी  कारखान्याचे प्रमोटर श्री. सचिन काळे  यांनी बॉयलरचे सपत्नीक विधिवत पूजन करण्यात आले.


या कार्यक्रमास माजी जि.प.सदस्य श्री.शंकर आण्णा उबाळे, येडेश्वरी कारखान्याचे संचालक श्रीधर बाबा भवर,बाळकृष्ण भवर,माजी सभापती अशोक तारळकर, विलास काका सोनवणे, बालासाहेब दादा बोराडे,गाताडे गुरुजी,रमेश आबा शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजी चौधरी, नारायण दादा शिंदे, पिंटू ठोंबरे, प्रेमचंद कोकाटे, तसेच भागातील सरपंच सेवा सोसायटीचे चेअरमन,प्रमुख कार्यकर्ते,ऊस उत्पादक शेतकरी,कर्मचारी आदी उपस्थित होते.


 कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे संचालक बाळकृष्ण भवर यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात एफआरपीपेक्षा १५० रुपये अधिक भाव दिल्याबद्दल शेतक-यांच्या वतीने बजरंग बप्पा सोनवणे यांचे आभार मानले.तसेच पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी येडेश्वरी कारखान्यालाच ऊस गाळपास द्यावा असे आवाहन केले. 


त्यानंतर शंकर आण्णा उबाळे, गाताडे गुरुजी, शिवाजी उर्फ बंडू चौधरी, माजी सरपंच किशोर तात्या थोरात, व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.  


  अध्यक्षीय समारोपामध्ये बोलताना  सोनवणे यांनी येडेश्वरी शेतक-यांच्या हितासाठी कटिबध्द आहे. गळीत हंगामात 2023 24 साठी  शेतकरी, सभासद यांना कारखान्यास ऊस देण्याचे आवाहन केले व कारखान्याचे जुने  सभासद यांना डिव्हिडंट देण्याचे जाहीर केले .तसेच दीपावली सणानिमित्त कारखान्याच्या सर्व कर्मचा-यांना दिवाळी बोनस जाहीर केले. गेल्या हंगामात  एफआरपीपेक्षा 150/- रुपये जास्त भाव दिलेला आहे व येणाऱ्या गळीत हंगामात एफआरपीपेक्षा अधिक भाव देण्यात येईल असे सांगितले .


. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज खोडसे  यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मण शिंदे यांनी केले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.