पिंपरी आणि ठोंबळसांगवी येथील शेतकऱ्यांच्या सर्व समस्या लवकरच सुटतील आ.सुरेश धस यांचे आश्वासन

 पिंपरी आणि ठोंबळसांगवी येथील शेतकऱ्यांच्या सर्व समस्या लवकरच सुटतील आ.सुरेश धस यांचे आश्वासन 

****************************



13 कोटी 33 लाख रुपये किमतीच्या विकास कामांचा शुभारंभ 

****************************






आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यातील लोणी जिल्हा परिषद गटामध्ये काही गावांमधील रस्त्यांचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असताना पिंपरी ते  वाहिरा हे रस्ता काम सहा कोटी रुपये किमतीचे असून ठोंबळसांगवी खरडगव्हाण ते काकडवाडी या रस्त्याचे कामाची किंमत चार कोटी पन्नास लाख रुपये असून या पंचक्रोशीतील सर्व गावांचे असलेले प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन आ.सुरेश धस यांनी दिले पिंपरी आणि ठोंबळसांगवी  येथील रस्ता कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते ..

यावेळी डॉ.पांडुरंग चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय आजबे,सरपंच दादा पांडुळे,दतोबा वाडेकर,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, जयशिंग गव्हाणे,अभिजित शेंडगे,ऋषीकेश दरेकर,अँड.रमेश जंजिरे,सरपंच विकास अमृते,माजी सरपंच प्रविण लाळगे,अशोक परकाळे,नवनाथ जगताप,राजू गावडे आदी उपस्थित होते.

       पिंपरी ते गवळी गोठा 1 कोटी 80 लाख रु. किमतीचे काम आहे ही सर्व कामे दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी सर्व बांधकाम उपविभाग आणि ग्रामस्थांची आहे रस्ता काम हे अनेक दिवसांनी होत असल्यामुळे आणि ते अनेक कायम होत असल्यामुळे चांगला दर्जेदार रस्ता करून घ्यावा यासाठी शेतकऱ्यांनी देखील रस्त्याच्या कडेची गोठे अतिक्रमण असतील तर ते काढून घ्यावेत असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले तसेच परिसरात परिसरातील शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने आणि नियमितपणे वीजपुरवठा होत नसल्यामुळे लवकरच चिंचोली येथे या ठिकाणी 220 के.व्ही . उपकेंद्रा साठी जागा निश्चित झाली असून लवकरच  परिसरातील विजेचा प्रश्न सुटणार आहे येथील शेतकऱ्यांना वीज पुरवठा होण्यासाठी घुमरी या उपकेंद्रावरून वीजपुरवठा करण्याबाबत आपण कार्यवाही करू तसेच पिंपरी परिसरामध्ये नवीन 33 के.व्ही. उपकेंद्र देखील करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावर्षी पावसाने काही भागात चांगली स्थिती निर्माण केली परंतु काही भागात पाऊस नसल्यामुळे त्याला कोरडे आहेत विशेषतः मातकुळी ते बळेवाडी दरम्यानचे सर्व तलाव पाण्याअभावी कोरडे ठाक असून या परिसरातील शेतकऱ्यांना पुढील काळामध्ये चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ शकते त्यामुळे ज्या भागांमध्ये सध्या पाण्याची स्थिती चांगली आहे त्यांनी जनावरांसाठी मक्याचे पीक घ्यावे मुरघास उत्पादन करावे त्यातून दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा म्हणून मक्याचे पीक उपयोगी ठरू शकेल असे त्यांनी सांगितले पिंपरी येथील साठवण तलाव पाण्याअभावी भरत नाही त्यामुळे या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा करण्यात यावा अशी या भागातील लोकांची मागणी आहे त्याबाबतही आपण विचार करू असे सांगत ते पुढे म्हणाले ..

परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी सीना डाव्या कॅनॉल मधील पाणी चारी क्रमांक 19 /100 पर्यंत काम करण्याची आवश्यकता आहे.. याच डाव्या कालव्याच्या 14 व्या  किलोमीटरवरील कानडी या गावाला देखील त्याचा फायदा होईल 

वाहिरा या गावासाठी देखील पाण्याची स्थिती गंभीर असल्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांसाठी टप्प्याटप्प्याने  उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले 

तर ठोंबळसांगवी येथील ठोंबळसांगवी- खरडगव्हाण- काकडवाडी या रस्ता कामाचा शुभारंभ देखील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्यांनी सांगितले की हा रस्ता देखील 4 कोटी 50 लक्ष रुपये किमतीचा असून ह्या रस्त्याद्वारे दळणवळणाची सोय होणार असून लवकरच बीड जिल्ह्यातील केवळ आष्टी तालुक्यासाठी मंजुरी देण्यात आलेला लोणी ते वृद्धेश्वर हा  " हॅम " योजनेअंतर्गत 600 कोटी रुपये मंजूर असलेला रस्ता सर्वेक्षणानंतर तात्काळ आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यावर निधी उपलब्ध करून घेऊ आणि लवकरच हा रस्ता सुरू करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले यावेळी बोलताना  अॅड.रमेश जंजिरे म्हणाले की आ.सुरेश धस नावाचे परिस असून या परिसरात ज्याचा परिसर स्पर्श होतो त्याचे सोने होते माणसे जमवण्याचे माणसे सांभाळण्याचे कसब या माणसाकडे असून आम्ही सेवानिवृत्त झाला तरी आमची मुले यांचे कार्यकर्ते आहेत म्हणजे जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि समाजाविषयी अत्यंत जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व आहे असे सांगितले.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.