आष्टीत तहसिलदारांची गाडी जळून भस्मसात

आष्टीत तहसिलदारांची गाडी जळून भस्मसात





 आष्टीचे तहसिलदार यांची गाडी पेटल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे . जुन्या तहसिलदार निवास समोर लावण्यात आलेली तहसिलदार यांची गाडी आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक पेटली . या गाडीने पेट घेतल्याची माहिती मिळताच तहसिलदार प्रमोद गायकवाड यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक खेतमाळस यांना संपर्क साधत घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी नगराध्यक्ष जिया बेग यांनी नगर पंचायतच्या अग्नीशामक गाडीला पाचारण करत आग विजविण्यासाठी प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली मात्र ही गाडी पूर्ण भस्मसात झाली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचे अंदोलन सुरू असून मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र जिल्हाभरात पहायला मिळत आहे . मात्र आष्टी येथील तहसिलदार प्रमोद गायकवाड यांच्या गाडीला आग लावली की, आग लागली याचा अजून तपास पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस करीत आहेत.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.