मराठा आरक्षणासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी दिले सामुहिक राजीनामे

 *मराठा आरक्षणासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी दिले सामुहिक राजीनामे*




*उबाठा शिवसेनेतील ३६ मराठ्यांनी दिले राजीनामे*

केज (प्रतिनिधी)

आज दिनांक - २९ ॲाक्टोंबर २०२३ रोजी केज तालुक्यातील शिवसेना उबाठा गटाचे युवासेना तालुकाप्रमुख अरविंद थोरात यांनी मराठा आरक्षणासाठी पदाचे राजीनामे देण्याचे शिवसेना युवासेना,वाहतुकसेना पदाधिकाऱ्यांना आवाहन केले होते.त्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा आरक्षणासाठी राजीनामा देऊन युवासेना,शिवसेना,वाहतुक सेना पदाधिकाऱ्यांनी आंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी अन्नपाणी त्यागून उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्याचे एकमताने ठरले.तसेच युवासेना तालुकाप्रमुख,वाहतुकसेना तालुकाप्रमुख,युवासेना विधानसभा प्रमुख,शिवसेना उपशहरप्रमुख,शिवसेना व युवासेना उपतालुकाप्रमुख,विभागप्रमुख,सर्कलप्रमुख,शाखाप्रमुख असे एकुण ३६ पदाधिकाऱ्यांनी विश्रामगृह केज येथील बैठकीत पक्षाच्या पदाचे आपल्या हस्ताक्षरात स्वेच्छेने राजीनामे दिले.

                यावेळी केज येथील विश्राम गृह येथे उपस्थित राहुन युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात,वा.ता.प्र.केज सुधीर जाधव,यु.वि.प्र.ज्ञानेश्वर बोबडे,यु.स.केज बबलु इंगळे,शिवसेना उपशहरप्रमुख पप्पु ढगे,अनिरुद्धा मुळे,वा.से.श.प्र.अमोल चौधरी,यु.उप.ता.प्र.राहुल जाधव,विशाल गायकवाड,चंद्रकांत चटप,शिवसेना शा.प्र.ढाकेफळ शिवाजी थोरात,सुरज सौंदणे,नंदकिशोर चौधरी,प्रदीप काळे,सागर जाधव,परमेश्वर साखरे,विश्वास राऊत,लखन सौंदणे,सतिश अंबाड,सुरज चौधरी,विशाल अंबाड,दिपक करपे,आकाश चटप,किशोर जाधव,सागर जाधव,शिवाजी बोबडे,स्वप्निल थोरात,ज्ञानेश्वर बोराडे,शरद इंगळे,सुनिल बप्पा जाधव,भाऊ शिंदे,कचरु थोरात,अशोक थोरात,सतिश कोकाटे,आदित्य कोटुळे,शाम गव्हाणे,विजय बोबडे,संतोष बोबडे,विठ्ठल बोबडे,नवनाथ क्षीरसागर सह पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वेच्छेने राजीनामे दिले…





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.