*आष्टी वार्ताहर 'दीपोत्सव' अंक सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारा दर्जेदार अंक*
*--- अभिनेत्री केतकी माटेगावकर*
********************
-------------------------------
आष्टी (प्रतिनिधी)
समाजातील विविध क्षेत्रातील कलावंताना साहित्यिकांच्या कलागुणांना शब्दबद्ध करत न्याय देण्याच्या भावनेतून गेली ३० वर्षापासून दिवाळीनिमित्त वार्ताहरचा दीपोत्सव हा अंक वाचकांसाठी पर्वणी आहे.बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातुन प्रकाशित होणारा आष्टी वार्ताहर 'दीपोत्सव' अंक सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारा दर्जेदार दिवाळी अंक असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेत्री केतकी माटेगावकर यांनी प्रकाशन सोहळ्यात केले.
मुंबई येथील गोरेगाव फिल्मसीटीमध्ये प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सुभाष पगारे,हनुमंत कावळे,केतकीची आई सौ.सुवर्णाताई माटेगावकर हे होते.यावेळी संपादक उत्तम बोडखे,संतोष मोटे,आकाश डोंगरे,
ओंकार बोडखे हे उपस्थित होते.
आष्टी वार्ताहर दीपोत्सव हा दिवाळीनिमित्त प्रकाशित होत असलेला विशेषांक वाचनीय वाटला.
राजकीय,सामाजिक, आर्थिक, धार्मिक,
वैचारिक ,सांस्कृतिक, शैक्षणिक आदींसह विविध क्षेत्रातील कलागुणांना या अंकाच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्यात आले आहे असे सांगीतले.
गुणी कलावंत ,
साहित्यिक यांना न्याय आणि सामाजीक बांधिलकीच्या माध्यमातून समाजसेवकांच्या कार्याला बळ देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. २९ वर्षांपासून अविरत, सातत्यपूर्ण दिवाळी
निमित्त वार्ताहर दीपोत्सव अंक हा वाचकांना दिला जातो. ३० वर्षाची परंपरा
असलेल्या पत्रकार उत्तम बोडखे संपादित आष्टी वार्ताहर दिवाळी अंकात विशेष कव्हर स्टोरी, कथा, कविता,विविध विषयांवर लेख ,
उपाहासिका आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार भरत घाटे यांच्या व्यंगचित्र आहेत.


stay connected