नवनाथ रणखांबे प्राईड ऑफ भारत या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

 नवनाथ रणखांबे  प्राईड ऑफ भारत या  राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

 




*भारत देशातील प्रतिष्ठित व राष्ट्राला समर्पित सन्मान सोहळा संपन्न*


(प्रतिनिधी पुणे ) 

    भारत देशातील प्रतिष्ठित व राष्ट्राला समर्पित सन्मान सोहळा 15 वे अखिल भारतीय कर्तव्यम् प्रेरणा महासंमेलनात ॲडिशनल  डायरेक्टर जनरल  ऑफ़ पोलिस महाराष्ट्र राज्य श्री. कृष्णाप्रकाश यांच्या हस्ते  साहित्यिक विचारवंत   नवनाथ  आनंदा रणखांबे  यांना  त्यांनी केलेल्या विवध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे    प्राईड ऑफ भारत या  राष्ट्रीय पुरस्काराने आचार्य अत्रे रंगमंदिर , पिंपरी चिंचवड , पुणे येथे  नुकतेच सन्मानित करण्यात आले . महत्त्वाचे  म्हणजे राजपत्रानुसार आपल्या देशाचे नाव भारत झाल्यानंतर " प्राईड ऑफ भारत " या नावाने संस्थात्मक व स्वायत्त स्तरावर दिल्या गेलेला हा देशातील पहिला सर्वोच्च पुरस्कार ठरला आहे .

       भारतीय सेनेतील अमर जवान ज्योतीला अभिवादन करून व पुष्पचक्र अर्पण करून कर्तव्यम् महासंमेलनाचा प्रारंभ झाला .भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात वायुसेना दिनानिमित्ताने भारतीय सेनेतील अमर बलिदानी शहीदांच्या परिवारातील वीरमाता व वीरपत्नी  आणि राष्ट्रधर्मासाठी  तत्पर  कार्यवीरांना समाजात राहून  विविध क्षेत्रात  कर्तव्य बजावत  असतांनाच आपल्या विविध कलागुणांनी स्वतःचे व समाजाचे नाव   उज्जवल करणाऱ्या   भारतातील लौकीकास पात्र  गुणीजनास विविध प्रतिभावंताना याप्रसंगी गौरविण्यात आले.

       यावेळी  संमेलनाध्यक्ष संतोष भाऊ बारणे ( संस्थापक अध्यक्ष कर्तव्यम् सोशल फाऊंडेशन पुणे)  ,  स्वागताध्यक्ष  अतुल जे. निकम  (संचालक नेहरू युवा केंद्र युवक कल्याण व क्रीडा  मंत्रालय भारत सरकार) , संजीव जैन्थ ( संचालक G 20 सचिवालय श्रम एवं रोजगार मंत्रालय नवी दिल्ली भारत सरकार) , महाराज  शिवाजी राजे जाधव, महाराज विजयसिंहराजे भोसले,  ब्रिगेडियर  राजेश गायकवाड (महासंचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य),   विशेष उपस्थितीमध्ये महावीर चक्र विजेता भारतीय सेना दिगेंद्र कुमार,   एयर मार्शल / एयर  व्हाईस भारतीय वायुसेनेचे  भूषण गोखले , प्रदीप  बापट आणि  नितीन वैध  , अप्पर आयुक्त तथा पणन  संचालक  सहकार महाराष्ट्र  सुनील गो पवार , मुख्य संयोजक  क्रांती कुमार महाजन  इ. मान्यवर उपस्थित होते .










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.