मराठा आरक्षण देत नसाल तर राजीनामा दयावा - सुरेश पाटील
बीड (प्रतिनिधी)
सध्या महाराष्ट्रात श्रीमंत मराठा व गरीब मराठा अशी दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे गरीब मराठा अधिकच गरीब होत चालला असल्याने गरीब समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. जर शिंदे-फडणवीस-पवार सरकारला आरक्षण देता येत नसेल तर प्रथम राजीनामा द्यावा. आणि मला मुख्यमंत्री करावे. मी कष्टाळू, गरीब मराठा समाजाला आरक्षण देतो अशी माहिती समाज माध्यमात शिव संघर्ष ग्रुपचे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटोळे यांनी दिली आहे.
ज्यांना लोकशाही माहित आहे ते आरक्षण देऊ शकत नाहीत. कारण ते स्वतः ओबीसी किंवा श्रीमंत मराठा आहेत. आणि ज्यांना लोकशाही समजलेली नाही त्यांच्या हातात सत्तेच्या चाव्या देवून नामधारी मुख्यमंत्री बनवले आहे. त्यामुळे गेली चाळीस वर्षे गरीब मराठा आरक्षणासाठी सरकारला विधानमंडळात प्रश्न उपस्थित करत आहेत. तसेच शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आंदोलन करूनही गरीब मराठा समाजाला न्याय मिळत नसल्याने आर्थिक दृष्ट्या तरुण-तरुणींनी आपले जीवनाचे बलिदान दिलेले आहे. परंतु मराठी माणसांच्या जीवावर श्रीमंत झालेले व सत्तेत बसलेले श्रीमंत मराठा नेते यांना याबाबत कसलेही सोयर-सुतक दिसत नाही. जर मराठा आरक्षण देता येत नसेल तर थोडीफार नैतिकता असेल तर सर्व मराठा आमदार व खासदारांनी आपल्या पदाचे राजीनामे देवून आपली भूमिका स्पष्ट करावी. आणि पुन्हा मध्यवर्ती निवणुका घेवून महाराष्ट्रातील मराठी माणसांनी मला मुख्यमंत्री करावे मी आरक्षण देतो अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांनी दिली.


stay connected