फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे.!
- ॲड. प्रज्ञेश सोनावणे
ठाणे (प्रतिनिधी आशा रणखांबे)
बौद्धजन पंचायत समिती शाखा २४७, भीमशक्ती मित्र मंडळ, पंचशिल महिला मंडळ, यांच्या वतीने दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ०८:०० वाजता नागसेन नगर, क्रीक रोड ठाणे पश्चिम येथे अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लक्ष्मण मोते, अध्यक्ष महाराष्ट्र पँथर कर्मचारी कामगार संघटना, महेंद्र पिठुराम शिंदे, सरचिटणीस महाराष्ट्र पॅंथर कर्मचारी कामगार संघटना, राहुल भिमराव पवार, अध्यक्ष भारतरत्न को ऑफ हौ. सो. ठाणे, अभय गायकवाड कार्याध्यक्ष
प्रमुख वक्ता म्हणून ॲड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांना पाचारण करण्यात आले होते त्यात ॲड. प्रज्ञेश सोनावणे यांनी (बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा आणि आपली जबाबदारी) या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती विठ्ठल सकपाळ (धम्म प्रचारक), शाहीर बाळासाहेब जोंधळे,
जयश्री महेंद्र शिंदे (महासचिव वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे शहर जिल्हा) आधी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.
आपल्या भाषणात ॲड. सोनावणे पुढे म्हणाले की, बुद्ध, फुले, शाहु, आंबेडकर यांची विचारधारा ही मानवाच्या कल्याणासाठी होती. जातीयता नष्ट करून नवासमाज निर्माण केला, त्यातच समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता लोकशाहीला मजबूत करण्यासाठी आपल्या भारताला प्रजासत्ताक बनवले. त्याची अंमलबजावणी व्हावी याची जबाबदारी महापुरुषांनी आपल्यावर दिलेली आहे.
तरुणांनी जास्त मोबाईल मध्ये अडकून न राहता, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचन कडे जास्त कल दिला पाहिजे. कारण इतिहासापासून आपल्या धडा शिकता आले पाहिजे, अन्यथा एक दिवस इतिहासच आपल्याला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. इतिहासाचे आपण सिंहावलोकन करणे आवश्यक आहे.
बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचारधारा यांची जपवणूक करणे हेच आजच्या तरुण पिढीची मोठी जबाबदारी आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी तेजस तुलसीराम मोते (अध्यक्ष भिम शक्ती मित्र मंडळ) होते, स्वागत अध्यक्ष ज्योति पंकज सोनावणे (अध्यक्ष पंचशिल महिला मंडळ) होत्या तर सुत्रसंचालन महेंद्र हाटे यांनी केले, त्यात शशिकांत खांबे, सागर आडसुळे, राहुल भोजने, किशोर बनकर, तसेच ॲड. जया कापुरे, कुसुम जोंधळे, ज्योति पंकज सोनावणे, श्रध्दा धोत्रे, स्वाती गायकवाड, स्वाती मोते, प्रज्ञा खांबे, शनिता कांबळे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


stay connected