केज येथे जीवा महाले यांची जयंती उत्साहात साजरी
केज (प्रतिनिधी)दि ०९ रोजी
केज येथे जीवा महाले चौकात सकल नाभिक समाजाच्या वतीने,जीवा महाले यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंती साजरी करीत असताना अनंतराव राऊत यांनी जीवा महाले यांचे विषयी शूरवीर का म्हटले जाते. याविषयी आपले विचार मांडले. छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांच्या भेटी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांना दगा फटका झाला. त्यावेळी शूरवीर जिवामहाले यांच्या शिफातशीमुळेच सय्यद बंडा याने छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेला हल्ला. सय्यद बंडाच्या हात वरच्यावर जिवा महाले यांनी आपल्या दांडपट्ट्याने कापला व छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्राण वाचवले, म्हणून त्या वेळेपासून एक म्हण सुरू झाली.
होता जीवा म्हणून वाचला शिवा.
महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारीच जीवामहाले यांचा अंगरक्षका प्रमाणेच चौक आहे. केज शहरात पण अशाच जिवा महाले चौकाचे सुशोभीकरण झालेले नाही. ही खंत वाटते, असे अनंत राऊत यांनी आपल्या भाषणादरम्यान बोलून दाखवले. यावेळी मा. श्री अनंतराव राऊत, ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप गायकवाड, संतोष राऊत, नवनाथ टोपे, ज्योतिराम झेंडे, महादू काटके, गणेश राऊत, रामभाऊ गवळी, विनोद पवार, अविनाश काळे, महादेव गायकवाड, संतोष काळे ,राहुल राऊत. इत्यादी उपस्थित होते.



stay connected