ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हा - निलेश भादवे

 ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हा - निलेश भादवे 



बीड ( प्रतिनिधी ):- दिनांक ११ ऑक्टोबर रोजी लढाई वंचितांच्या सत्तेची या महासभे साठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा .ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित रहाणार असुन बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते निलेश भादवे यांनी केले आहे.

      सध्या देशभर मोदी सरकारने सुरू केलेले कंत्राटी पद्धतीने सरकारी नौकरी भरती,सरकारी शाळांचे खाजगीकरण, दलित मुस्लीम अल्पसंख्याक समाजावर देशभर होत आसलेले हल्ले, मराठा आरक्षण ,ओबीसींचे राजकीय आरक्षण मुस्लिम आरक्षण, गायरान धारकांची प्रश्न या सर्व विषयांवर बाळासाहेब आपली भुमिका मांडणार आहेत. या सभेला प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर, प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण, फारूक भाई अहमद, प्रा. नागोराव पांचाळ,ॲड. सर्वजित बनसोडे,ॲड.गोंविद दळवी, मा.अनिलभाऊ जाधव प्रा.विष्णु जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.

       ही सभा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बीड येथे दुपारी दोन वाजता होणार आहे.तरी बीड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी,शेतमजुर युवक महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सभा यशस्वी करावी असे आव्हान निलेश भादवे यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.