कडा बंधारा पॅटर्न राज्यात राबविणार उपमुख्यमंञी अजित पवार यांची ग्वाही
आ.बाळासाहेब आजबे यांच्या मागणीला यश.
कडा(प्रतिनिधी)-
कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणा-या आष्टी तालुक्यातील कडा येथील नदीवर बांधण्यात आलेला उच्चालक बंधा-या प्रमाणे मतदारसंघात इतर ठिकाणीही कडा प्रमाणे उच्चलक बंधारे बसण्यात यावेत अशी आ.बाळासाहेब आजबे यांनी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्याकडे केली असता तात्काळ अजित पवार यांनी दखल घेत धिर्डी,शिराळ,नांदा व हनुमंत गावात बंधारे बसविण्याच्या कामासाठी तत्वता;मान्यता दिली असल्याची माहिती आ.बाळासाहेब आजबे यांनी दिली आहे.
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील जलसंधारण व मृद विभागाच्या विविध विकास कामासंदर्भात मंञालयात राज्याचे उपमुख्यमंञी अजित दादा पवार यांच्या दालनात जलसंपदा विभागाची बैठक घेण्यात आली या बैठकीस उपमुख्यमंञी अजित पवार,मृद व जलसंधारण मंञी संजय राठोड, आमदार बाळासाहेब आजबे ,मुख्य सचिव मृद जलसंधारण एकनाथ डौले,संचालक मृद व जलसंधारण कोशीरे साहेब,मुख्य अभियंता काळे साहेब यांच्यासह आदि उपस्थित होते.सुरूवातीला मृद व जलसंधारणचे माजी कार्यकारी अभियंता कोटेचा यांनी आपल्या कार्यकाळात आष्टी तालुक्यातील कडा नदीवर बांधण्यात आलेल्या उच्चालक बंधारा कशा पध्दतीने उपयुक्त व फायदेशीर ठरत आहे याची माहिती दिली तर आमदार आजबे यांनी मतदार संघातील पाण्याची भिषणता व दुष्काळी परिस्थितीचा आढावा देत या तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी कडा येथील उच्चारक बंधाऱ्याप्रमाणे मतदारसंघात इतर ठिकाणीही या पद्धतीचे बंधारे होणे गरजेचे असल्याचे सांगितले याची दखल खुद्द राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांनी घेत प्रायोगिक तत्वावर तालुक्यातील धिर्डी,शिराळ,नांदा व हनुमंत गाव या चार ठिकाणी कडा बंधारा पॅटर्ननुसार उच्चलक बंदरे करण्याच्या सुचना देत या कामाला तत्वता;मंजूरी दिली आहे.तसेच हे चार बंधारे यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यात हा उच्चालक बंधारे बांधणार असल्याचेही अजित दादा पवार यांनी जाहिर केले असल्याची माहिती आ.बाळासाहेब आजबे यांनी दिली.



stay connected