आष्टी तालुक्यातुन मनोज जारंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे... गणेश पांडुळे.

 आष्टी तालुक्यातुन  मनोज जारंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे... गणेश पांडुळे.






कडा/ प्रतिनिधी .



सध्या मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी शासनाला 40दिवसाचा कालावधी दिला असुन तो आता संपत आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटे जिल्हा जालना य ठिकाणी 14आक्टोबर 2023 वार शनिवारी सभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी मराठा समाजाने एकत्र यावे व सरकारला दाखुन द्यावे की एक मराठा लाख मराठा एकत्र आल्यावर काय होते .

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही ही भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे त्यामुळे संपुर्ण देशातुन मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे.तरी सर्व मराठा शेतकऱ्यांची मुले मुली यांना आरक्षण मिळाले तर शेतकरी याचे मुले मुली यांना शिक्षणामध्ये ,नौकरीमध्ये यांना कुठे तरी फायदा होईल तरी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला यश यिवे यासाठी आष्टी तालुक्यातुन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती गणेश पांडुळे यांनी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.