Nagar Ashti Railway fire: रेल्वेला लागली भिषण आग ; सुदैवाने जिवीतहानी टळली
अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नगर- आष्टी रेल्वेला भीषण आग लागली. सोलापूर रोडवर नगर-आष्टी रेल्वेच्या मागच्या सहा डब्यांना शिराढोण जवळ अचानक आग लागली. आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.
मिळालेली माहिती अशी की, अहमदनगर- आष्टी रेल्वेला वाळूंज बायपासजवळ भीषण आग लागली आहे. रेल्वेच्या सहा डब्यांना भीषण आग लागली.. अग्निशमन दलाच्या चार गाड्या आग विझवण्यासाठी रवाना झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत . ही आग कशामुळे लागली? याचे कारण अद्याप समजलेले नाही. आग आणि धूराचे लोट पाहून परिसरातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.
मध्य रेल प्रसिद्धि पत्रक
सोलापुर विभाग.
*गाड़ी नं. 01401/01402 अहमदनगर - न्यूआष्टी-अहमदनगर ( डेमू) ट्रेन रद्द*
गाड़ी क्र. 01401/01402 अहमदनगर – न्यू आष्टी -अहमदनगर हि गाड़ीचा रॅक उपलब्ध नसल्यामुळे दिनांक 17.10.2023 ते पुढील आदेश येई पर्यंत ट्रेन रद्द करण्याचे मध्य रेल्वे प्रसाशनने ठरविले आहे.
तरी सर्व संबंधित रेलवे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी .
-------
मध्य रेल. मंडल रेल प्रबंधक का कार्यालय,
मोनं.सोला/वा/प्रप/465/23/10/09. वाणिज्य शाखा, सोलापुर.
दिनांक :- 16.0710.2023 .


stay connected