Manoj Jarange पाटील खरा छत्रपती मराठा बाकी नेते बांगड्या भरा : डॉ. जितीन वंजारे

 *'जहाज बुडाली तरी चालेल पण कॅप्टन मलाच करा' याच वृत्तीमुळे मराठा समाज मागे-डॉ जितीन वंजारे*

Manoj Jarange पाटील खरा छत्रपती मराठा बाकी नेते बांगड्या भरा : डॉ. जितीन वंजारे



*मराठ्यांना आरक्षण एक अराजकीय व्यक्तीच देऊ शकतो,आजपर्यंत किती मराठे आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री  झाले पण एकानेही आरक्षण देऊ केले नाही बर सत्तेत आपण विरोधात आपण सगळीकडे आपणच मराठे असताना आरक्षण भेटू न देणे म्हणजे आपल्यातलेच कोणीतरी गद्दार असले पाहिजेत कारण 'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' असतो.आपल्यातलेच प्रस्थापित मराठे गरीब मराठ्यांना आरक्षण देऊ करत नाही आणि गरीब मराठे दुसऱ्या जातीतील लोकांना आपला नेता मानत नाहीत.आपल्याला कसही लोटलं तरी आपण त्यांचे पक्के जातीय मतदार आहोत हे त्यांना पक्क माहीत आहे म्हणून ते आरक्षण देत नाहीत आणि म्हणून मनोज जरांगे सारख्या अराजकीय लोकांच्या पाठीशी आपण उभे रहा.आपल्याला आरक्षण अगोदरचा एकही नेता देणार नाही त्यामुळे मनोज जरांगेच्या पाठीशी समाजाने एकजूट व्हावं असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा खालापूरीकर यांनी व्यक्त केले

आरक्षणाचा खरा वारसदार मनोज जरांगे होणार असे चिन्ह असताना त्यांची बदनामी आणि त्यांना अटक करण्याची मागणी ज्या षंड लोकांनी केली ते मराठा आहेत का अगोदर तपासून पाहा कारण यावेळेस मराठा आरक्षण भेटेल अशी चिन्हं दिसत असताना काही समाजातीलच लोक त्यांना विरोध करत आहेत ते कोणत्या तरी नेत्याची भाड खाऊन बोलत आहेत .आता मराठ्या नेत्यांची दुकानदारी बंद होणार ह्या भीतीने आणि मनोज जरांगे  पाटील मराठा आरक्षणाचा जनक ठरणार असल्याने भल्या भल्याची धाबे दणाणले आहेत .महाराष्ट्रातील एका वयोवृध्द पुढाऱ्यांनी तर चांगलीच जरब खाल्ली आहे पण मनोज जरांगे यांची फिल्डींग एकदम टाईट असल्या कारणाने आणि स्वतः जीवावर उदार होऊन मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सज्ज असलेल्या खरा छत्रपती मराठा मनोज जरांगे पाटील ह्याच्या सारखा खंबीर नेता मराठ्यांना मिळणं गरजेचं आहे .आणि मराठा समाज सगळ्यात ज्या लोकांचे एकीव आहे त्याच लोकांनी गेल्या पन्नास वर्षांपासून त्यांना आपल्या चाकरीसाठी वापरलं यामुळे माराठयातील गरीब मराठा गरीबच राहिला आणि श्रीमंत मराठा श्रीमंत च झाला .यामुळे मराठा समाजात मोठी दरी निर्माण झाली आणि आज मराठ्यांना रस्त्यावर उतरावे लागले याला जबाबदार येथील प्रस्थापित मराठाच असून आजपर्यंत महाराष्ट्राची धुरा याच समाजातील थोड्याच लोकांकडे होती त्यामुळे कारखाने यांचे ,सरपंच यांचे ,पंचायत समिती यांचीच,झेड पि मेंबर यांचेच ,नगरपालिका, महानगपालिका,आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री यांचेच असताना महाराष्ट्राचं सगळं नेतृत्व हेच करत असताना यांनाच आरक्षण मागण्याची वेळ येऊ देन म्हणजे आपल्यातलेच चार टक्के वाक्यांचे गुलाम आहेत हेच सिद्ध होत आहे .ज्या पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आयत्या पिठावर रेघुट्या मारून आय्याशी केली त्याच पेशवाईची उरलेली पाळेमुळे आजपर्यंत मराठा आरक्षणाला आडवी आली हेही तितकच खर आहे .आणि म्हणून मी मा.सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर मराठा बांधवाना सांगू इच्छितो की मनोज जरांगे पाटील यांच्या मागे खंबीर उभ राहून शेवट पर्यंत हाल सोडू नका आज ना उद्या आरक्षण मिळेलच.महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्याकाळी मराठ्यांना आरक्षण देऊ केलं होतं पण त्याही काळी आम्ही छत्रपती आम्ही राजकरते आम्ही पाटील आम्हाला आरक्षणाची गरज नाही बाबासाहेब तुम्ही आम्हाला भिकारी समजता काय ? अस म्हणून बाबासाहेबांवर विखारी टीका टिप्पणी केली त्यावेळी शेवटी कंटाळून बाबासाहेबांनी एकच प्रतिक्रिया दिली की बाबांनो आज मी तुम्हाला आरक्षण देतो आहे तुम्ही नाकारता आहात पण जेंव्हा तुम्हाला आरक्षनाची  गरज पडेल तेंव्हा ते देण्यासाठी मी नसेल यावरून बाबासाहेब आंबेडकर हे किती दूरदृष्टी आसलेला महान तत्त्ववादी,प्रचंड ज्ञानवंत, प्रज्ञापंडीत,अभ्यासपूर्ण समाजनिष्ट नेता होते हे सिद्ध होतंय .आज त्यांनीच दिलेल्या हिंदू कोड बिल,महिला सबलीकरण,कामगार बिल,नदीजोड प्रकल्प, दळणवळण,भारतीय रिझर्व बँक,आरक्षण,पुणे करार, अस्पृषता निर्मूलन,मागासवर्गीयांसाठी च्या योजना,संरक्षण कायदे, महिलांविषयी हक्काचे कायदे, समान संपत्ती हक्क, स्री शिक्षण,दलीत शिक्षण आणि मताचा अधिकार, कामगार सुट्टी कामाचे तास गरोदर पनातील महिलांना सुट्टी,इत्यादी एक ना अनेक हजारो कायदे त्या महामानवाने त्याकाळी लिहून अमलात आणले काही कायदे अजूनही आमालात आणले नाहीत ह्याची गरज आज या स्वतंत्र भारताला  पडत आहे.आणि काही हरामखोर बाबासाहेबाना ,त्यांच्या पुतळ्यांना ,त्यांच्या फोटोना पाहून जळतात या महान प्रज्ञा सूर्याची भगवान  बुद्धांनंतर जगता सर्वात जास्त पुतळे आहेत त्याच कारण त्यांच्या पाशी असलेलं ज्ञान आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात तुमचं धन, दौलत, द्रव्य,इज्जत, इभ्रत सगळं लुटलं जाईल पण तुमच्या जवळ असलेले विचार आणि ज्ञान कोणीही चोरी करू शकत नाही आणि म्हणून ज्ञानवंत व्हा पुस्तके वाचा अस बाबासाहेब नेहमी सांगायचे.

         बाबासाहेबाना एकदा एका पत्रकाराने विचारले की बाबासाहेब तुम्ही एकटे आहात तरीही सगळे नेते सभागृहात तुम्हाला का भितात? तुमच्या मांडलेल्या मताला एकही विरोध का होत नाही?यावर महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मित हास्य करतात आणि त्याला उत्तर देतात अरे बाबा माझ्याकडे माणसं नाहीत, मला पक्ष नाही मला बॅकअप नाही पण माझ्याकडे ज्ञान आहे आणि नुसतं ज्ञान असून उपयोग नाही तर मी माझ्याशी आणि माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे,मी नेक आहे मी नियतीने चालतो त्यामुळे मला कोणी विकत घेऊ शकत नाही आणि मी स्वतःला विकू देत नाही आणि म्हणून मला सगळे भितात.त्यामुळे समाजात न विकणारे नेते पाहिजेत, पैसा अडका घेऊन समाजाशी गद्दारी करणारे भुरटे नेते नको आहेत आणि म्हणून एक सर्वसामान्य पोरगं मनोज जरांगे पाटील उभ राहील आहे ते समाजाशी प्रामाणिक आहे त्याची मराठा आरक्षणासाठी जीव द्यायची पण तयारी आहे त्याला जाहीर समर्थन देऊन समाज म्हणून सर्व सकळ मराठा मागे थांबुया इतकच आव्हाहन मी मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर करतो आहे......

*लेखन सामाजीक कार्यकर्ते डॉ जितीन वंजारे ९९२२५४१०३०*











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.