Rajyasabha खासदार Sanjay Singh यांच्या सभेला Amravati जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते रवाना
आम आदमी पार्टीची बुलंद तोफ राज्यसभा खासदार कट्टर इमानदार संजय सिंग यांची भव्य दिव्य जाहीर सभा सोमवार ११ सप्टेंबर २०२३ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर काॅलेज मैदान काॅटर गेट चौक नाना पेठ पुणे सोमवार सांयकाळी ४ वाजता येथे होत आहे. महाराष्ट्रातील बेरोजगारी मराठवाड्यात व विदर्भात पडलेला दुष्काळ शिक्षणाचे होत असलेले बाजारीकरण आरोग्यामध्ये होत असलेले मोठमोठे घोटाळे या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी राज्यसभा संसद माननीय संजय सिंग हे पुण्यामध्ये जन सभा घेत आहे. या सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यक्रर्त व पदाधिकारी एकत्र येऊन पुढील येणाऱ्या महाराष्ट्राची दिशा ठरविण्यासाठी एकत्र येत आहेत. याच सभेला अमरावती जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष इंजी सुभाष गोहत्रे व संघटन मंत्री अॅड डॉ प्रविण बारंगे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते रवाना झाले आहेत. सर्वांना आमंत्रित करत आहे की आपण देखील या सभेत जास्तीत जास्त संख्येने यावे व महाराष्ट्राची राजनीती बदलण्यासाठी आपणही सहभागी होऊन साक्षीदार बनावे.



stay connected