केज तालुक्यात शिवसंग्रामला मोठे खिंडार बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत दाखल डॉ. उत्तम खोडसे यांचा राष्ट्रवादीत ( शरद पवार गट) प्रवेश

 केज तालुक्यात शिवसंग्रामला मोठे खिंडार बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत दाखल
डॉ. उत्तम खोडसे यांचा राष्ट्रवादीत ( शरद पवार गट) प्रवेश 



केज प्रतिनिधी 

आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मा.खा.शरदचंद्रजी पवार , महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष,आ.जयंतराव पाटील, खा‌.सुप्रियाताई सुळे ,.खा.आमोल कोल्हे  , आ.जितेंद्र आव्हाड, आ.रोहीत  पवार,  महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष बबन भाऊ गित्ते , युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महेबुब शेख , बीड जिल्हा अध्यक्ष  आ. संदीप भैया क्षिरसागर , बीड लोकसभा मा. खा.जयसिंग काका गायकवाड, केज विधानसभा मा.आ.पृथ्वीराज साठे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या विशेष बैठकीत शिवसंग्राम चे डॉ उत्तम खोडसे यांनी शिवसंग्रामला सोडचिठ्ठी देत  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत ( शरद पवार गट) जाहिर प्रवेश झाला.


या पक्षप्रवेशामुळे केज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांनी मोठी ताकत तयार झाली असून येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत इतर पक्षाला शरद पवार यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे.


 यावेळी उपस्थित मान्यवरांनी पक्ष प्रवेशानंतर डॉ उत्तम खोडसे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.