आंदोलकांवर लाठीहल्ला करणा-यांवर कारवाईची मागणी - मराठा आरक्षण आंदोलनास काँग्रेसचा पाठींबा- ढोबळे

आंदोलकांवर लाठीहल्ला करणा-यांवर कारवाईची मागणी
-------------
मराठा आरक्षण आंदोलनास काँग्रेसचा पाठींबा- ढोबळे

----------



 कडा / वार्ताहर

--------------

अंतरवली सराटी येथे उपोषण करणा-या मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीहल्ला करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणा-या अधिका-यांवर सरकारने बडतर्फीची कारवाई करावी. अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रविंद्र ढोबळे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.


याबाबत महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळेंसह तहसीलदार प्रमोद गायकवाड यांना काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने शांततेत उपोषण करणा-या आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला करणा-या अधिका-यांवर सरकारने बडतर्फीची कारवाई करावी. तसेच सदर घटना लोकशाही सुव्यवस्थेला काळीमा फासणारी असून, शाहू, फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेचा निषेध करून या मराठा समाजाच्या आंदोलनास काँग्रेसचा पाठींबा असल्याचे रविंद्र ढोबळे यांनी सांगितले. याप्रसंगी विजयकुमार जाचक, काकासाहेब कर्डीले, बाळासाहेब कटके, दिलिप गाडे, व इतर उपस्थित होते

------%%--------  

-




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.