वंचित शेतक-यांना पीकविमा मंजूर करावा - सरपंच आमले
--------------
कडा / वार्ताहर
-----------
तालुक्यातील दौलावडगाव महसूल मंडळातील अनेक गावे पीकविमा अग्रीम मधून कुठल्या निकषानुसार वगळण्यात आली. याची चौकशी करून वंचित शेतक-यांना पीकविमा मंजूर करावा. अशी मागणी अंभोरा गावचे सरपंच सागर आमलेंसह शेतक-यांनी आष्टीच्या तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
याबाबत तहसीलदार प्रमोद गायकवाड यांना अंभोरा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीकविमा अग्रीम योजनेतून तालुक्यातील दौलावडगाव महसूल मंडळातील अनेक गावे वगळण्यात आल्यामुळे या भागातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार असल्यामुळे महसूल विभागाच्या अधिका-यांनी प्रत्याक्षात पाहणी केली तर सत्य परिस्थिती निदर्शनास येईल. कारण पीकपेरा केल्यापासून आतापर्यंत या परिसरात पाऊस झाला नसल्याने बहुतेक शेतक-यांनी शेतामधील पीके पाळी घालून मोडून टाकली आहेत. त्यामुळे महसूल विभागाने पुन्हा एकदा पाहणी करुन राहिलेल्या वंचित शेतक-यांना पीकविमा मंजूर करावा. अन्यथा मंगळवार दि. १२ सप्टेंबरला दौलावडगाव महसूल मंडळातील शेतकरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा अंभो-याचे सरपंच सागर आमले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
--------%-% -----
stay connected