शिक्षक दिनानिमित्त शाळेत कार्यक्रम सुरू असतांनाच हृदय विकाराने झाले शिक्षिकेचे दुर्दैवी निधन

 शिक्षक दिनीच शिक्षकेचा तीव्र ह्रदयविकार झटकाने मृत्यू..

****************************

शिक्षक दिनानिमित्त शाळेत कार्यक्रम सुरू असतांनाच हृदय विकाराने झाले शिक्षिकेचे दुर्दैवी निधन

*****************************



*****************************

आष्टी(प्रतिनिधी)

शहरातील श्री पिंपळेश्वर महादेव देवस्थान संचलित अनिषा ग्लोबल स्कूलमध्ये आज शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यक्रम सुरू असतांनाच ह्रदय विकाराचा झटका आल्याने शिक्षीकेचा मृत्यू झाला.शिक्षक दिनीच त्यांना मृत्यू आल्याने शहरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मृत्यूपूर्वी 10 मिनिटा आधी चा VDO



    या बाबत अधिक माहिती अशी की,जामखेड नगरपरिषदेचे कर्मचारी असलेले राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी सुनिता राजेंद्र गायकवाड यांचे वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या आष्टी शहरातील श्री पिंपळेश्वर महादेव देवस्थान संचलित अनिषा ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या.मंगळवार दि. ५ रोजी शाळेत आयोजित शिक्षक दिनाचा कार्यक्रम सुरू असताना दुपारी १२:०० वाजताचे सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्या खुर्चीवर बसत असताना खाली कोसळल्या.त्यानंतर त्यांना आष्टी शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले व त्यानंतर ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले.त्यांच्यावर दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास जामखेड शहरातील तपनेश्वर स्मशानभूमी करण्यात आला.

यावेळी अंत्यसंस्कारास स्कुल च्या संचालिका सौ.प्राजक्ताताई सुरेश धस यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील अनेक जण उपस्थित होते.

सुनिता राजेंद्र गायकवाड यांच्या अचानक दुर्दैवी मृत्युने आष्टी व जामखेड शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पती राजेंद्र गायकवाड व दोन मुली,जावाई,नातवंडे असा परिवार आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.