गांधी महाविद्यालयात जैवविविधतेवर व्याख्यान संपन्न
देवळाली (प्रतिनिधी अतुल जवणे):-श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे गांधी महाविद्यालय कडा प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने व सामाजिक वनीकरण विभाग आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने जैव विविधता (बायोडायव्हर्सिटी ) या विषयावर वन अधिकारी श्री अमोल घोडके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री अमोलक ऋषीजी म.सा. यांच्या प्रतिमा पूजनाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन एस राठी , उपप्राचार्य डॉ. ज मो. भंडारी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रमेश आबदार व त्यांचे सहकारी यांनी केली
कामाचे प्रस्ताविक प्रा. डॉ.विशाल वैद्य यांनी केले जैवविविधता या विषयावर श्री अमोल घोडके यांनी मार्गदर्शन करताना तापमान व भौगोलिक परिस्थिती यांचा जैवविविधता याच्यावर होणारा परिणाम वेगवेगळ्या उदाहरणासह विद्यार्थ्यांसमोर मांडला. आपल्या व्याख्यानामध्ये महाराष्ट्रातील जैवविविधता प्रमुख्याने उस्मानाबाद (धाराशिव ) व आष्टी तालुक्यातील परिसरातील आढळणारे वन्यप्राणी व वनस्पती यांचा परस्पर संबंध उलगडून दाखवला तसेच सामाजिक वनीकरणाच्या दृष्टीने धोकादायक असणाऱ्या विविध विषयांची विद्यार्थ्यांसमोर सुयोग्य पद्धतीने मांडणी केली.
मानवी वस्त्या व परिसरामध्ये होणारे वन्य प्राण्यांचा शिरकाव याची विस्तृत मांडणी करताना ढासळलेली नैसर्गिक परिस्थिती संदर्भात भाष्य करताना करताना मानवाने निसर्गाची घ्यावयाची काळजी याचे महत्त्व अधोरेखित केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.एन एस राठी यांनी विद्यार्थ्यांना जंगल व यांचे संवर्धन करताना घ्यावयाची काळजी याविषयी अधिकचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सुदाम जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. अमोल कल्याणकर यांनी मानले कार्यक्रमास विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीत्ते साठी श्री पवार एस.टी ,श्री अशोक खाडे श्री मुकुंद बेलेकर यांनी सहकार्य केले.
stay connected