लवकरात लवकर पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी..! ॠषिकेश दरेकर
----------------------------------------
पाऊस आला धावून,शेत गेले वाहून.! परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान
-----------------------------------------
आष्टी/प्रतिनिधी
तालुक्यामध्ये काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.काही शेतकऱ्यांचे गुरेही पाण्यात वाहून गेले. मुसळधार पावसामुळे या नाल्याच्या दुरूस्तीचे पितळ उघडे पडले.काही भागात नाल्याच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांच्या नाल्यालगतच्या शेताला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. शिवाय पाण्याच्या प्रवाहामुळे या शेतातील उडीद, सोयाबीनचे पिकही खरडुन गेले त्यामुळे शेतकर्यांवर चांगलेच आर्थिक संकट ओढवले आहे.तरी महसूल व कृषी विभागाने तातडीने या नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून संबंधित शासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळवुन द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा तालुकाध्यक्ष ॠषिकेश दरेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
stay connected