रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे ग्रामस्थ त्रस्त, ग्रामस्थ आंदोलन,उपोषण करण्याच्या तयारीत.

 रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे ग्रामस्थ त्रस्त, ग्रामस्थ आंदोलन,उपोषण करण्याच्या तयारीत.



- आष्टी तालुक्यातील पिंपळा -सुंबेवाडी - ठोंबळ सांगवी,- हातोळण रहदारीचा हा रस्ता प्रवासा योग्य राहिला नाही या रस्त्याची दुरावस्था झाली आहे अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरुस्तीची ग्रामस्थांकडून मागणी होत आहे मात्र हा रस्ता दुरुस्त होत नाही या रस्त्याने पिंपळा येथे शाळेसाठी सुंबेवाडी ठोंबळ सांगवी गावातील अनेक विद्यार्थी जात आहेत. सर्वांसाठी आवश्यक असणारा हा रस्ता लवकारात लवकर दुरुस्थ करावा सध्या पावसाचे दिवस असल्याने या रस्त्यावर चिखल, खड्डे व पाणी साचून राहत आहे. त्यामुळे गाडीने जाने येणे या अवघड झाले आहे शासण दरबारी वारंवार रस्त्याची मागणी केली असता ती पूर्ण होत नाही.हा रस्ता वाहतूक योग्य होवा म्हणून अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत या रस्त्याने जाणाऱ्या लोंकाची खूप मोठी गैरसोय होत आहे.



आष्टी प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन दोन महिन्याच्या आत रस्ता दुरुस्त करावा नसता सर्व ग्रामस्थ मिळून उपोषणाला बसतील किंवा तीव्र आंदोलण करतील. तरी प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन रस्ता दुरुस्ती चे काम लवकारात लवकर करावे असे आव्हाण ग्रामस्थांच्या वतीने अमर वाळके यांनी केले आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.