आष्टी तालुक्यातील शाळा महाविद्यालय सोमवारी बंद ? आष्टी तालुका सकल मराठा समाज आक्रमक

 आष्टी तालुक्यातील शाळा महाविद्यालय सोमवारी बंद ? आष्टी तालुका सकल मराठा समाज आक्रमक



********************************

आष्टी (प्रतिनिधी)

मराठा समाजास सरसकट कुणबी म्हणून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी 

अंतरवली सराटी येथे गेल्या अकरा दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठी बसले असून त्यांच्या समर्थनात आष्टी तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी आष्टी शहर व तालुकाभरातील शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्ग बंद ठेवण्याची हाक आष्टी तालुका सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने करण्यात आली आहे.

      मराठा समाजासाठी आरक्षणाचा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा व जीवनमरणाचा बनला असून, या पार्श्वभूमीवर बंदसाठी आपण सहकार्य करावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी वाहतूक संघटनांनाही असा आर्जव करण्यात आला होता. या बंदबाबत समाजमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणात संदेश झळकाविण्यात आले आहेत.शिक्षणसंस्था, शिकवणीवर्ग संचालक, विद्यार्थी वाहतूक संघटना, विद्यार्थी व पालक यांनी सोमवारी होणाऱ्या शाळा,महाविद्यालय बंद मध्ये शंभर टक्के सहभाग घ्यावा अशी विनंती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व सकल मराठा समाज बांधवांनी केली आहे.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.